old is gold story of bollywood actress
old is gold story of bollywood actress 
मनोरंजन

वय वाढलं म्हणून काय झालं भाऊ, अजूनही 'ब्युटी' कडक

युगंधर ताजणे

मुंबई -  कोणे एकेकाळी वयं वाढलेल्या अभिनेत्री आऊट डेटेड होत असतं. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे वाढत्या वयाचा त्यांच्या दिसण्यावर झालेला परिणाम. यामुळे त्यांना काम मिळणं अवघड होऊन बसायचं. कुणाच्या तरी कृपाशिर्वादानं एखादी जाहिरात मिळायची. कुणी सण समारंभ यांना उपस्थिती लावून आपला पी आर जपण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. आता मात्र जमाना कमालीचा बदललाय. 21 व्या शतकात वय कितीका वाढलेलं असेना व्यायामाच्या जोरावर पुन्हा नव्या तारुण्याचा अनुभव घेत असलेल्या अभिनेत्री सोशल मीडियावर कमालीच्या लोकप्रिय आहेत.

बॉलीवूड मधील काही सेलिब्रेटी अभिनेत्री अशा आहेत की ज्यांची सुंदरता त्यांच्या वयानुसार वाढताना दिसत आहे. वयाची चाळीशी ओलांडल्यानंतरही त्यांच्या तारुण्याचा प्रभाव प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला आहे. अशाच काही अभिनेत्रींचा परिचय करुन घेऊयात.

1.  शिल्पा शेट्टी - योगाचा प्रचार आणि प्रसार करण्यात शिल्पा शेट्टी मागे नाही. ती जेव्हा वेळ मिळेल तेव्हा योगाचे धडे देत असल्याचे दिसून आले आहे. वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरही तिनं लोकांना व्यायामाचे महत्व पटवून दिलं आहे. 45 वर्षीय शिल्पाची सुंदरता लक्ष वेधून घेणारी आहे. आता ती जवळपास 13 वर्षानंतर मोठ्या पडद्यावर कम बॅक करणार आहे.

2. रविना टंडन - रविना सध्या काही औषधांच्या जाहिराती करत असल्याचे दिसून आले आहे. मात्र त्यात तिचा लुक पाहिल्यास ती 46 वर्षांची आहे हे सांगूनही विश्वास बसणार नाही. 90 च्या दशकात रवीनाच्या नावाचा दबदबा होता. स्टायलिश हिरोईन म्हणून तिची ओळख होती. इंस्टाग्रामवर तिचे 5 मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत.

3. मलाईका अरोरा - ज्या प्रकारे मलाईकानं स्वताला मेंटेंन केलं आहे ते पाहून कुणालाही तिचा हेवा वाटावा. तिला फॉलो करणा-यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. 47 वर्षांची असणारी मलाईका आपल्या डाएट, व्यायाम याविषयी कमालीची दक्ष आहे. सोशल मीडियावरही ती कायम चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. नुकतेच तिनं इंस्टावर काही फोटो पोस्ट केले आहेत.

4. तब्बू -  कोणं म्हणतं तब्बू 50 वर्षांची आहे म्हणून. आजही तिच्या सौंदर्यात कुठलीही कमतरता नाही. बॉलीवू़मध्ये ज्या अभिनेत्रींनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले त्यात तब्बुच्या नावाचा समावेश करावा लागेल. गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वी तिचा आयुषमान खुराणा सोबतचा अंधाधून चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तसेच तिनं अ सुटेबल बॉय या मालिकेतही काम केलं आहे.

5. मलिका शेरावत - मलिकानं बॉलीवूडमध्ये हॉटनेसचा एक वेगळा ट्रेंड आणला असे म्हणण्यास हरकत नाही. मर्डर चित्रपटाच्या माध्यमातून तिनं आपली वेगळी ओळख प्रेक्षकांच्या मनावर उमटवली होती. 44 वर्षांची मल्लिका आजही तितकीच हॉट आहे.

6. विद्या बालन -  विद्या बालनविषयी काय बोलावं. वयाची 42 ओलांडलेल्या विद्याचा मागील वर्षी शंकुतला देवी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातून विद्यानं आपण अजूनही तरुणच आहोत. याची प्रचिती करुन दिली होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT