Bollywood: After argentina wins world cup 2022, netizens said akshay already started preparing for messi biopic Google
मनोरंजन

FiFA: अर्जेंटिना जिंकणार हे अक्षयला आधीच माहित होतं,म्हणूनच तर त्याने...,सोशल मीडियावर चर्चेला उधाण

अर्जेंटिना जिंकला तेव्हा ताबडतोब त्यांच्या जर्सीत अक्षयचे ढिगभर फोटो लोकांनी पोस्ट केले. काही नेटकरी तर खिलाडी कुमारची फिरकी देखील घेतानाही दिसले.

प्रणाली मोरे

FIFA: रविवारी रात्री फीफा वर्ल्ड कपच्या फायनलनं फूटबॉल चाहत्यांना एक अविस्मरणीय अनुभव दिला. अर्जेंटिनानं अनेक वर्षांनी ही ट्रॉफी जिंकून इतिहास रचला आहे. यासोबतच अर्जेंटिनाचा कॅप्टन लियोनेल मेसी याचा कारकिर्दीतला हा शेवटचा वर्ल्ड कप खूपच यादगार राहिला. वर्ल्ड कपमध्ये मेसी सर्वाधिक मॅच खेळणारा खेळाडू बनला आहे.

मेसीनं या मॅचमध्ये फ्रान्सच्या विरोधात पहिला गोल करून खातं उघडलंच शिवाय पेनल्टी शूटआऊटचा पहिला गोल देखील मेसीनेच केला. यावेळी प्रत्येक फूटबॉल प्रेमीच्या ओठावर मेसीचेच नाव आहे ते त्याच्या रेकॉर्ड ब्रेकिंग करिअरमुळे. चाहते अक्षरशः आपल्या या लाडक्या खेळाडूला सलाम ठोकताना दिसत आहेत.(Bollywood: After argentina wins world cup 2022, netizens said akshay already started preparing for messi biopic)

अर्जेंटिना टीमचे चाहते सोशल मीडियावर बोलताना दिसत आहेत की,''आम्ही चॅम्पियन आहोत''. तर भारतातील मेसीचे चाहते सोशल मीडियावर एक वेगळाच सूर ओढताना दिसत आहेत. चाहत्यांनी सोशल मीडियावर अर्जेंटिनाच्या जर्सीमधील अक्षय कुमारचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो 'हाऊसफुल ३' सिनेमातील एका सीनचे आहेत,ज्याला नेटकरी शेअर करताना दिसत आहेत. नेटकरी म्हणत आहेत-''अक्षय कुमार मेसीच्या बायोपीकमध्ये काम करत आहे आणि मेसीची भूमिका साकारत आहे''.

तर यावर एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की, 'अक्षय कुमार आपल्या आगामी सिनेमासाठी तयार आहे'. एका नेटकऱ्यानं तर बायोपीकसाठी नावही सजेस्ट केलं आहे.'Lionel Messi- The Legent Of Argentine बायोपीक येतेय,ज्यात अक्षय कुमार आहे'.

एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'अक्षय कुमारने मेसीवर बायोपिकची घोषणा केली आहे आणि सिनेमाचीन तयारी देखील सुरू केली आहे'. एकानं कोणीतरी लिहिलंय की,'अक्षयनं आपल्या नव्या सिनेमाची तयारी सुरु केली आहे. आणि तो सिनेमा म्हणजे मेसी ची बायोपिक असणार आहे'. अर्थात, हे तर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की अक्षय कुमारला बायोपिक किंग म्हणून ओळखलं जातं. आणि म्हणूनच ट्वीटरवर लोक अक्षय कुमारची फिरकी घेताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT