Aishwarya rai birthday esakal
मनोरंजन

Aishwarya rai birthday: अब्जावधींची मालकिन आहे ऐश्वर्या! जगते राणीसारखं आयुष्य

Aishwarya Rai's birthday: How rich is the Bollywood star?

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चन आज तिचा वाढदिवस साजरा करत आहे. ऐश्वर्या यावर्षी 'Ponniyin Selvan 2' चित्रपटात राणीच्या भूमिकेत दिसली.

खऱ्या आयूष्यातही ऐश्वर्या राणी सारखीच राहते. तिच्याकडे अफाट संपत्ती आणि प्रसिद्धीही आहे. ती बी-टाऊनमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. ऐश्वर्या रॉय बच्चनची एकूण संपत्ती किती आहे...

माजी मिस वर्ल्ड आणि बॉलिवूड ऐश्वर्या राय बच्चन हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ऐश्वर्या याच तिचा 49 वा वाढदिवस साजरा करत आहे . चला तर मग या खास प्रसंगी ऐश्वर्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

ऐश्वर्या रॉयच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर ती सुमारे 828 कोटींची मालक आहे.ती एका चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये घेते.

ऐश्वर्या राय मोठ्या ब्रँड्सच्या जाहिरातीही करते. ऐश्वर्या केवळ ब्रँड एंडोर्समेंटमधून वर्षाला 80 ते 90 कोटी कमावते. तर ऐश्वर्या एका दिवसाच्या ब्रँड एंडोर्समेंटसाठी सुमारे 6-7 कोटी रुपये घेते. अभिनेत्री असण्यासोबतच ऐश्वर्या एक बिझनेसवुमन देखील आहे. ती हेल्थकेअर स्टार्टअपमध्ये गुंतवणूकदार देखील आहे.

ऐश्वर्याकडेही महागड्या गाड्यांचं कलेक्शन आहे. तिच्या कार कलेक्शनमध्ये 7.95 कोटींची रोल्स रॉयस घोस्ट, 1.60 कोटी रुपयांची मर्सिडीज-बेंझ एस350डी कूप, 1.58 कोटी रुपयांची Audi A8 L, 2.33 कोटी रुपयांची Lexus LX 570 आणि मर्सिडीज-बेंझ कार आहे.

ऐश्वर्या तिच्या कुटुंबासोबत 'जलसा'मध्ये राहते, ज्याची किंमत 112 कोटी रुपये आहे. याशिवाय ऐश्वर्या आणि तिचा पती अभिषेक बच्चन यांनी दुबईच्या जुमेराह गोल्फ इस्टेटमधील सेंच्युरी फॉल्समध्ये पॅलेससारखा 15.6 कोटी रुपयांचा एक आलिशान व्हिला खरेदी केला आहे.

यासोबतच ऐश्वर्या रायचे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 5,500 स्क्वेअर फूटमध्ये एक लक्झरी अपार्टमेंट आहे. ज्याची आज एकूण किंमत २१ कोटींपेक्षा जास्त आहे.

ऐश्वर्या पती अभिषेक बच्चनपेक्षा चारपट जास्त कमावते. अभिषेकची संपत्ती 200 कोटी रुपये आहे तर ऐश्वर्याची संपत्ती 828 कोटी रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT