Virat kohli hotel video Anushka Sharma Virat Kohli esakal
मनोरंजन

Virat kohli hotel video: 'तुमच्या बेडरुममध्ये कोणी घुसलं तर....; अनुष्काचा संताप

सकाळ डिजिटल टीम

विराट कोहलीची क्रेझ ही सर्वश्रुत आहे. सर्वात प्रसिद्ध व्यक्तिमत्वांपैकी तो एक आहे. त्याला मोठ्या प्रमाणात चाहते फॉलो करतात. T20 विश्वचषकासाठी सध्या ऑस्ट्रेलियात आहे आणि जिंकण्यासाठी खुप मेहनतही घेतांना दिसत आहे. त्याच्या संदर्भात एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली.

एका अनोळखी चाहत्याने विराट खोलीत नसतांना पर्थमध्ये विराट कोहलीच्या खोलीत घुसून त्याच्या खोलीचा व्हिडिओ बनवला आहे. विराट कोहलीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत यास भयानक म्हटले आहे.

विराटने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर व्हिडिओ शेअर करताना लिहिले: "चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूंना पाहून खूप आनंदी आणि उत्साहित होतात हे मला समजते आणि त्यांना भेटण्यासाठी उत्साहित होतात आणि मी त्याचे नेहमीच कौतुकही केले आहे. पण हा व्हिडिओ भयावह आहे आणि यामुळे मला माझ्या गोपनीयतेबद्दल खूप चिंता वाटत आहे. जर मला माझ्या स्वतःच्या हॉटेलच्या खोलीत गोपनीयता ठेवता येत नसेल, तर माझ्या पर्सनल स्पेसबद्दल कुठे अपेक्षा करू शकतो? कृपया लोकांच्या गोपनीयतेचा आदर करा आणि त्यांना मनोरंजनाचं साधन मानू नका."

त्यानंतर लगेचच अनुष्काने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर विराटचा व्हिडिओ पुन्हा शेअर केला आणि लिहिले," भूतकाळात काही घटना अनुभवल्या आहेत ज्यात काही चाहत्यांनी कोणतीही सहानुभूती किंवा द्या दाखवली नाही पण ही खरोखरच सर्वात वाईट गोष्ट आहे. जे लोक म्हणतायत की तुम्ही तर सेलिब्रेटी आहात मग असं होणारच, त्यांना मी सांगू इच्छिते, की हे अतिशय वाईट आहे. एका व्यक्तीचा अपमान आणि त्याच्या प्रायव्हसीचं उल्लंघन आहे. याचा कधीतरी तुम्हालाही सामना करावा लागू शकतो. प्रत्येकाने स्वतःवर कंट्रोल करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि जर हे तुमच्या बेडरुममध्ये घुसून केलं जात असेल तर मग मर्यादा कुठे आहेत? याचाही विचार व्हायला हवा.थोडासा सेल्फ कंट्रोल प्रत्येकाला मदत करतो. तसेच, जर हे आपल्या बेडरूममध्ये होत असेल तर याला मर्यादा कुठे आहे?"

याआधीही त्यांनी मीडियाला त्यांची मुलगी वामिकाचे फोटो शेअर न करण्याची विनंती केली होती. तेही फोटो लिक झाले होते त्यानंतर हा प्रकार खुप धक्कादायक आहे. अनुष्काच नव्हे तर कोहलीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना,वरुण धवन, अर्जुन कपूर, परिणीती चोप्रा, डेव्हिड वॉर्नर आणि इतर अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये आपला राग व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election साठी भाजप-शिवसेना एकत्र, पण राष्ट्रवादीचा उल्लेख नाही, जागावाटपाचा फॉर्म्युलाच सांगितला!

Dhurandhar Craze in Pakistan: पाकिस्तानात ‘धुरंधर’ पाहण्याची क्रेझ! बंदी असतानाही लोक कसे पाहतायत चित्रपट?

Kolhapur Property Survey : करवीर तालुक्यात ऐतिहासिक सर्वेक्षण; १३२ गावांतील ४० हजार मिळकतींना युनिक ओळख

Agriculture News : नाशिकमध्ये रब्बी पीकविम्याला थंडा प्रतिसाद! ४ लाख शेतकरी विम्यापासून दूर; काय आहे कारण?

Latest Marathi News Live Update : वर्धेच्या देवळीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

SCROLL FOR NEXT