Aryan Khan
Aryan Khan  Esakal
मनोरंजन

Aryan Khan Bollywood Entry: पप्पा सेटवर नक्की या.... आर्यनच्या प्रश्नावर शाहरुखचं भन्नाट उत्तर

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान यांचा लाडका मूलगा आर्यन खान लवकरच अभिनेता म्हणून नाही तर लेखक म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. तेही वेबसीरिजच्या माध्यमातून तो मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे. आज त्याने एक पोस्ट करून आपल्या आगामी प्रेजेक्ट बाबत माहिती दिली आहे. 'लिखाण पूर्ण झालं असून असून आता अॅक्शन म्हणण्यासाठी उत्सुकता लागली असल्याचं' आर्यन खानने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

आर्यन खानच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट केली. आर्यन खानने मंगळवारी त्याच्या दिग्दर्शनाची घोषणा केली. वडिल शाहरुख खान आणि गौरी खान आणि अनेक जवळच्या आणि प्रिय व्यक्तींपैकी अनेकांचा यात सामावेश होता. शाहरुख आणि आर्यनने त्याच्या प्रोजेक्टच्या आगामी शूटबद्दल कमेंटमध्ये थोडाश्या गप्पा मारल्या आहे.

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना शाहरुख खानने लिहिले, “व्वा….विचार …विश्वास…स्वप्न पाहिलं पूर्ण झालं, आता हिम्मत केली.. पहिल्या कामासाठी शुभेच्छा. हे नेहमीच खास असतं..." यावर आर्यनने त्याला उत्तर दिलंयं, "धन्यवाद! सेटवर तुझ्या सरप्राईज व्हिजिटची वाट पाहतोय हाहा." शाहरुखने मात्र तो फक्त दुपारनंतर सेटला भेट देणार असल्याचं म्हटंल आणि लिहिलं, “मग दुपारची शिफ्ट्स ठेवं... सकाळी नको!” त्याला विनोदात उत्तर देताना आर्यनने लिहिले, "नक्कीच... फक्त रात्रीचं शूट."

आर्यनची आई गौरी खानने देखील त्याच्या पोस्टवर कमेंट केली होती, “पाहण्यासाठी वाट पाहू शकत नाही.” आर्यनच्या फ्रेंड सर्कलमधील शनाया कपूरने देखील टिप्पण्या विभागात “Woooooo” अशी प्रतिक्रिया दिली. इंडस्ट्रीतील इतर अनेकांनीही त्याला शूभेच्छा दिल्या.

आर्यनला ऑक्टोबरमध्ये क्रूझ शिप ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. 25 दिवस कोठडीत राहिल्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. नंतर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो च्या विशेष तपास पथकाने पुष्टी केली की आर्यन मोठ्या ड्रग्स प्रकरणात किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी सिंडिकेटचा भाग असल्याचा कोणताही पुरावा नाही. त्यानंतर त्याला सोडण्यात आलं होतं. आता त्याच्या या पदार्पणामूळे अनेक नव्या चर्चांना उधान आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : ‘असली- नकली’चा वाद! नाशिक, कल्याणमधून मोदींची ठाकरेंवर टीका

Nana Patole : मोदींचा मुस्लिम द्वेष पुन्हा दिसला

Pandharpur News : भाविकांना जूनपासून होणार विठूरायाचे पदस्पर्श दर्शन

Team India Coach: फ्लेमिंग बनणार टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक? CSK च्या सीईओकडून आले स्पष्टीकरण

Pune Crime : व्यवसायात भागीदारीसाठी तगादा लावल्याने तरुणाने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT