Atal Bihari Vajpayee Biopic, Main Atal Hoon...pankaj tripathi post Instagram
मनोरंजन

Atal Bihari Vajpayee Biopic: 'मनात थोडीशी भीती..पण मै अटल हूं..', पंकज त्रिपाठीच्या पोस्टनं वेधलं लक्ष

अटल बिहारी वाजपेयी यांच्या जीवनचरित्रावर आधारित बायोपीक संदर्भात सध्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे, हा सिनेमा २५ डिसेंबर २०२३ रोजी प्रदर्शित होतोय.

प्रणाली मोरे

Atal Bihari Vajpayee Biopic Name:: प्रसिद्ध अभिनेता पंकज त्रिपाठी भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या बायोपिक मध्ये काम करत आहे ही गोष्ट आता सर्वप्रचलित आहे. पंकज त्रिपाठीचे चाहते आता त्याला अटल बिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत पाहण्यासाठी आतुर आहेत. पंकज त्रिपाठीनं एका नव्या पोस्टच्या माध्यमातून 'मै अटल हूं..' या आपल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील बायोपिकचं नाव सांगत लवकरच हा सिनेमा आपल्या भेटीस येतोय हे सूचित केलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आपला मराठमोळा दिग्दर्शक रवी जाधव करत आहे. (Atal Bihari Vajpayee Biopic, Main Atal Hoon...pankaj tripathi post)

पंकज त्रिपाठीनं केलेल्या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं आहे की,'' मनात रोमांच दाटून आलाय, थोडीशी भीती देखील वाटतेय,मनात अनेक भावनांचा कल्लोळ आहे, पण सिनेमाप्रतीची निष्ठा बळ वाढवतेय. आणि हा सगळा उत्साह अटलजींना समर्पित...आता मै अटल हूं..लवकरच येतोय.

अटल बिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तिमत्त्वाला पडद्यावर साकार करणं म्हणजे एखाद्या कठीण परिक्षेला बसण्यासारखंच आहे. पण या परिक्षेसाठी अटलजींचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. आणि आम्हाला अटळ विश्वासही आहे.

तेव्हा 'मै अटल हूं' ही आमची बायोपिक लवकरच येतेय...'',अशी एकंदरीत पोस्ट आहे.

पंकज त्रिपाठीच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट करत अभिनेत्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अटलजींची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी पंकजपेक्षा दुसरा कोणताच कलाकार योग्य नसता अशी देखील कमेंट काही जणांनी केली आहे. हा सिनेमा अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी म्हणजे २५ डिसेंबर,२०२३ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT