bollywood big b amitabh bachchan appriciates abhishek for bigg bull jaya not watch before release  
मनोरंजन

अभिषेकचा चित्रपट पाहून बिग बी झाले भावूक; 'बिग बुल' प्रदर्शित 

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - गुरु या चित्रपटानंतर अभिषेक बच्चनवर अभिनेता म्हणून शिक्का बसला. असे म्हणता येईल. यापूर्वी त्यानं जेवढे चित्रपट केले त्यात त्याच्या वाट्याला यश काही आलं नाही. केवळ महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा म्हणून त्याची ओळख प्रस्थापित होऊ लागली होती. त्यातून बाहेर पडण्याचा अभिषेकनं प्रयत्न केला खरा. मात्र त्यातही त्याला अपयश आलं. त्यानं अॅक्शन, फॅमिली ड्रामा, कॉमेडी सारख्या वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केले पण प्रेक्षक अजूनही त्याला हिरो म्हणून स्वीकारायला तयार नाहीत. मणिरत्नम यांच्या गुरु चित्रपटात अभिषेकनं साकारलेली भूमिका भाव खाऊन गेली होती. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. अलीकडे अनुराग बसु दिग्दर्शित लुडो चित्रपटात त्याच्या वाट्याला छोटीशी भूमिका आली होती. त्याचं ते कामही प्रेक्षकांना आवडलं होत. आता अभिषेकचा बिग बुल नावाचा चित्रपट आला आहे.

बिग बुल हा चित्रपट आता प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अभिषेकच्या कामाचं कौतूक होत आहे. केवळ प्रेक्षकांनाच नाहीतर साक्षात महानायक अमिताभ यांनाही अभिषेकच्या कामानं भारावून टाकलं आहे. ज्यावेळी बिग बींनी त्याचा चित्रपट पाहिला त्यावेळी ते म्हणाले, आपल्या मुलाचं काम पाहून मी भारावून गेलो आहे. अभिषेकनं त्यात चांगलं काम केलं आहे. बिग बींनी या चित्रपटाचा प्रिमियर पाहिला होता. दुसरीकडे जया बच्चन या चित्रपट प्रदर्शनापूर्वी तो पाहत नाहीत.

अमिताभ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे, तुम्ही काहीही म्हणा मुलं नेहमी आपला सॉफ्ट स्पॉट असतात. ते ज्यावेळी उल्लेखनीय कामगिरी करतात तो दिवस तुमचा सर्वात आनंदाचा दिवस असतो. आनंद आणि समाधानाची भावना त्यावेळी दाटून येते. आता ती भावना मला अभिषेकचा तो मुव्ही पाहिल्यानंतर दिसून आले आहे. आपल्या मुलानं काही भव्य दिव्य करणं हे वडिलांसाठी नेहमीच गौरवास्पद असते. मी काही इतर पालकांसारखा नाही. अशा प्रकारच्या गोष्टींना प्रतिसाद देताना नेहमी हास्य आणि अश्रु यांची मदत घ्यावी लागते.

 बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अभिषेक बच्चननं सांगितलं होतं, माझी आई जया बच्चन हिनं प्रिमियर काही पाहिला नाही. त्याचे कारण म्हणजे ती चित्रपट प्रदर्शनापूर्वी ती काही पाहत नाही. ती थोडी अंधश्रध्दाळू आहे. ९ एप्रिल तर माझा जन्मदिवस आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

M Phil Professors : १४२१ प्राध्यापकांना मिळाला दिलासा! एम. फिल धारक प्राध्यापकांना अखेर नेट/सेटमधून सूट

Latest Maharashtra News Live Updates: मराठीत बोललो तर माध्यम माझी भावना सर्व महाराष्ट्रातील लोकांना लाईव्ह दाखवतील - फडणवीस

Thane News: ठाण्यात उभी राहणार ग्रीनवॉल! पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष प्राधिकरण विभागाचा निर्णय

Pune News : तीन वर्षात टाकली केवळ ९ किलोमीटरचीच सांडपाणी वाहिनी; प्रशासनाने टोचले ठेकेदाराचे कान

Monsoon Session: तुकडेबंदी कायदा रद्द! पुढे कशी असेल कार्यप्रणाली? 'त्या' जमिनींना नियमातून वगळले

SCROLL FOR NEXT