bollywood bobby deol shocking character revealed in ranbir kapoor rashmika mandanna film animal  Esakal
मनोरंजन

Animal Film: बॉबी देओल चित्रपटात एक शब्दही बोलणार नाही! कारणही आलं समोर

Vaishali Patil

Animal Movie Bobby Deol: रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना आणि बॉबी देओल यांचा 'अ‍ॅनिमल' चित्रपट रिलीज होण्यास सज्ज झाला आहे. या चित्रपटाच्या टीझरपासून ते गाण्यांपर्यंत सर्वच गोष्टींना चाहत्यांनी खूप पसंती दिली आहे.

1 डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये दाखल होणार आहे. सध्या सोशल मिडियावर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. एकीकडे 'अॅनिमल' मधील रणबीरचा लूक चाहत्यांना आकर्षित करत आहे तर दुसरीकडे बॉबी देओलच्या व्यक्तिरेखेबद्दल चाहते अजूनही गोंधळले आहेत.

बॉबी देओलच्या भुमिकेबद्दल निर्मात्यांनी टिझर आणि गाण्यांमध्ये फारसा खुलासा केलेला नाही. केवळ टीझरमध्ये बॉबी देओलची एक झलक दिसली होती. जी पाहिल्यानंतर बॉबीच्या चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतलं.

'अॅनिमल'चा ट्रेलर 23 नोव्हेंबरला रिलीज होणार आहे. निर्मात्यांना बॉबी देओलच्या भुमिकेबाबत सस्पेन्स कायम ठेवायचा आहे. मात्र आता बॉबी देओलच्या व्यक्तिरेखे संबंधित माहिती समोर आली आहे.

बॉबी देओलची टीझरमध्ये 20 सेकंदांची झलक दाखवण्यात आली होती, ज्यामध्ये तो एक शब्दही बोलला नाही, परंतु तो एक खतरनाक खलनायकाची भुमिका साकारत आहे हे काळले होते.

आता टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बॉबी देओल 'अ‍ॅनिमल' या चित्रपटात एका मूक व्यक्तीची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात तो एक शब्दही बोलणार नसला तरी त्याची दहशत खुप असेल. आता बॉलिवूडमध्ये पहिल्यांदाच बॉबी मूक खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हा चित्रपट ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ज्यात हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि तामिळ भाषेचा सामावेश आहे. या सिनेमॅटिक मास्टरपीसमध्ये रणबीरसोबत अनिल कपूर, रश्मिका मंदान्ना, बॉबी देओल आणि तृप्ती डिमरी प्रमुख भूमिकेत आहेत.

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सिरीज, मुराद खेतानी यांचा सिने1 स्टुडिओ आणि प्रणय रेड्डी वंगा यांच्या भद्रकाली पिक्चर्स यांनी अॅनिमल'ची निर्मिती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT