Boycott Pathaan Esakal
मनोरंजन

Pathaan: हिंदूंच झालं.. आता मुस्लिम भडकले.. दीपिकाच्या बिकिनीच काही खरं नाही..

सकाळ डिजिटल टीम

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठाण' चित्रपटावरचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. मध्य प्रदेशातील हिंदू संघटनांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला. 'बेशरम रंग' गाण्यात दीपिका पदूकोणनं घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीला पाहून अनेक हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला आहे. यानंतर आता देशभरात सिनेमाला घेऊन मोठा वाद पेटला आहे. प्रकाश राज आणि पायल रोहतगीनंतर आता अभिनेत्री शार्लिन चोप्रा यांनीही याबद्दल प्रतिक्रिया दिल्या मात्र आता मुस्लिम संघटनाही या चित्रपटाच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत.

राज्यातील उलेमा बोर्डाने चित्रपटाला विरोध केला असून तो राज्यात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं सांगितले आहे. त्याचबरोबर ऑल इंडिया मुस्लिम फेस्टिव्हल कमिटीनेही 'पठाण'ला विरोध केला आहे. मध्य प्रदेश हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होऊ देणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. मुस्लिम धर्माची बदनामी करण्याची परवानगी कोणालाही नाही, मग तो शाहरुख असो किंवा अन्य खान.

उलेमा बोर्डाचे अध्यक्ष सय्यद अनस अली यांनीही 'पठाण'वर आक्षेप घेत हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नसल्याचं सांगितलं. एएनआयशी बोलताना सय्यद अनस अली म्हणाले, 'या चित्रपटामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आम्ही हा चित्रपट केवळ मध्य प्रदेशातच नाही तर संपूर्ण देशात प्रदर्शित होऊ देणार नाही. पठाण हे मुस्लिम समाजातील एक प्रतिष्ठित समुदाय आहेत. या चित्रपटातून केवळ पठाणांचीच नव्हे तर संपूर्ण मुस्लिम समाजाची बदनामी केली जात आहे. 'पठाण' असे या चित्रपटाचे नाव असून यामध्ये महिला अश्लील डान्स करताना दिसत आहेत. चित्रपटात पठाणांना चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बाळानं उडता तीर अंगावर घेतलाय, ज्यांच्या तुकड्यावर जगलात त्यांनाच....; अजितदादांच्या शिलेदरांची राजन पाटलांना वॉर्निंग

Viral Photo : विकी कौशल–कतरिनाच्या बाळाचा फोटो व्हायरल? चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण; खरं काय ते समोर आलं

Nagpur Bribe : नागपूर पोक्सो प्रकरणात महिला पोलिस तपास अधिकारीने साक्षीदाराला धमकावत मागितली लाच!

Yeola News : 'शिक्षक द्या शिक्षक!' हवालदार वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान; पालकांसह थेट पंचायत समिती गाठली

Latest Marathi Breaking News Live Update : कोल्हापूर जिल्ह्यात थंडीची तीव्रता वाढणार

SCROLL FOR NEXT