Bollywood celebrities at Jio World Plaza launch Esakal
मनोरंजन

Jio World Plazaच्या उद्घाटनात भरली बॉलिवूड कलाकारांची जत्रा! ग्लॅमरस लूकने कार्यक्रमात लावले चार चाँद

Vaishali Patil

Bollywood celebrities at Jio World Plaza launch: अंबानी कुटुंबाने मंगळवारी जिओ वर्ल्ड प्लाझाचे उद्घाटन केले होते. मुंबईतील सर्वात मोठ्या मॉल जिओ वर्ल्ड प्लाझाच्या उद्घाटनाच्या एक दिवस आधी मुंबईतील लाँच इव्हेंटमध्ये बॉलिवूड स्टार्स दिसले.

या उद्घाटनावेळी बॉलिवूड कलकारांनी आपल्या ग्लॅमरस अवतारात हजेरी लावली. त्याचबरोबर या कलाकारांनी रॅम्पवर आपली जादू दाखवली. हा भव्य मॉल 1 नोव्हेंबरपासून लोकांसाठी खुला होणार आहे.

Bollywood celebrities at Jio World Plaza launch

या कार्यक्रमात अंबानी कुटुंबाच्या दोन्ही सूना श्लोका मेहता आणि राधिका मर्चंट वेगळ्या अंदाजात दिसल्या. दोघांची ही स्टाईल पहिल्यांदाच पाहायला मिळाली. त्याचबरोबर बॉलीवूड स्टार्सनीही या कार्यक्रमात आपल्या लूकने मोहिनी घातली.

जिओ वर्ल्ड प्लाझा मॉलच्या लॉन्च इव्हेंटमध्ये अनेक स्टार्स व्यतिरिक्त, क्रिकेटर्स आणि उद्योगपतींनी देखील रेड कार्पेटवर दिसले. सलमान खानपासून दीपिका पदुकोणपर्यंत आणि रणवीरपासून सुनिल शेट्टी पर्यंत अनेक स्टार्सनी रेड कार्पेटवर आपली जादू पसरवली.

अभिनेता राजकुमार राव आणि त्याची पत्नी पत्रलेखा हे देखील मुंबईतील जिओ वर्ल्ड प्लाझा लाँचच्या रेड कार्पेट इव्हेंटमध्ये दिसले. तर आलिया भट्टनेही आपली जादू दाखवली. दीपिका पदुकोण या कार्यक्रमात वेस्टर्न लूकमध्ये दिसली. तिने ऑफ-शोल्डर ग्रे रंगाचा ड्रेस परिधान केला होता तर गळ्यात हिऱ्याचा हार घातला होता.

तर रणवीर सिंग पूर्ण काळ्या धोतर आणि कोटमध्ये दिसला. अभिनेत्री काजल अग्रवाल आणि तिचा पती गौतम किचलू यांनीही जिओ वर्ल्ड प्लाझा लॉन्चच्या रेड कार्पेट इव्हेंटमध्ये आपली उपस्थिती दर्शवली.

तर दुसरीकडे शहनाज गिलने लाल गाऊनमध्ये सर्वांचे लक्ष वेधले. नुसरत भरुचा आणि मॉडेल मलायका अरोरा आपल्या ग्लॅमरस अवतारात दिसले.

याशिवाय रश्मिका मंदान्नाने गोल्डन आणि व्हाइट शॉर्ट ड्रेस घालून कार्यक्रमात एंट्री केली तर अथिया शेट्टी वडील सुनील शेट्टीसोबत क्रॉप टॉप आणि प्रिंटेड कोट पँटमध्ये पोज देताना दिसली. तर सलमान खान आपल्या वेगळ्या अंदाजात या पार्टीत दिसला.

तर या पार्टीत रितेश देशमुख आणि जेनेलियाच्या जोडीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या कलाकरांसोबतच जॉन अब्राहम, तमन्ना भाटिया, करण जोहर, नोरा फतेही, सारा अली खान आणि सोनम कपुर देखील अपल्या सौंदर्याची जादू पसरवताना दिसल्या. सध्या कलाकारांचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT