Layar Shot Ad is Shameful..Tweeted Celebrities
Layar Shot Ad is Shameful..Tweeted Celebrities esakal
मनोरंजन

Perfume Ad: 'ही जाहिरात लज्जास्पद..' परफ्यूमच्या जाहिरातीवर का भडकले सेलिब्रिटी ?

सकाळ ऑनलाईन टीम

सोशल मीडियावर सध्या 'लेयर शॉट' या परफ्यूमची जाहिरात चर्चेचा विषय बनली आहे.त्याला कारणही तसंच आहे.या जाहिरातीवर सेलिब्रिटी आणि नेटकऱ्यांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे.(richa chadha)फरहान अख्तर,प्रियंका चोप्रा,रिचा चड्ढा,स्वरा भास्कर,सोना मोहपात्रा यांसारख्या सेलिब्रिटींनी या जाहिरातीवर टीका करत संताप व्यक्त केलाय.

"सामुहिक बलात्काराला प्रोत्साहन (Rape)देणाऱ्या या बॉडी स्प्रेच्या जाहिरातीला बनवण्यामागे,जाहिरात मंजूर करण्यामागे किती विचित्र डोकी कामाला लागली असतील ?(Farhan Akhtar)लज्जास्पद" अशा शब्दांत फरहानने जाहिरातीवर टीका केली.

"ही जाहिरात(Advertisement) म्हणजे अपघात नव्हे.ही जाहिरात प्रदर्शित होण्याआधी आणि बनण्याधी अनेक निर्णयांच्या प्रक्रियेतून गेली असेल.क्रिएटीव्ज,स्क्रिप्ट,एजन्सी,ग्राहक,कास्टिंग आणि बऱ्याच प्रक्रियेतून जाहिरातीची निर्मिती होत असते.या सर्वांना बलात्कार म्हणजे विनोद वाटतोय काय ?" अशा शब्दांत रीचाने संताप व्यक्त केला.

बॉलीवुडपासून हॉलीवुडपर्यंत फॅन फॉलोविंग असणाऱ्या प्रियंकाने देखिल (Priyanka Chopra) या जाहिरातीवर संताप व्यक्त केलाय."लज्जास्पद आणि घृणास्पद.या जाहिरातीला हिरवा कंदिल दाखवण्यासाठी किती जणांकडून परवानगी घ्यावी लागली असेल.(Tweet)किती जणांना ही जाहिरात ठीक वाटली असेल यावर टीका होऊन कारवाही झाली ते बरं झालं." असे ट्विट प्रियंकाने केले आहे.

इतक्या टीका होणाऱ्या या परफ्यूमच्या जाहिरातीत नेमकं काय होतं ?

खरं तर दुहेरी अर्थासह ही जाहिरात शूट करण्यात आली आहे.ज्यात चार मुलं एका ठिकाणी शॉपिंग करण्यासाठी येतात.त्याच ठिकाणी त्यांच्यापुढे एक मुलगी शॉपिंग(layer Shot Perfume) करत असते.एकाच अँगलने परफ्युम आणि त्या मुलीचा सीन शूट करण्यात आलाय."ती एक आणि आपण चार कोणाला शॉट मिळेल" असं एक मुलगा म्हणतो.जेव्हा मुलगी घाबरून मागे बघते तेव्हा ती मुलं परफ्यूमच्या बॉटलबद्दल बोलत असल्याचं समजतं.या जाहिरातीवर सगळीकडून संताप व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग! महाराष्ट्रात भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

Latest Marathi Live Updates : ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

Nashik Crime News : जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक! मंदिर परिसरात सापडलेल्या मानवी कवट्या प्लॅस्टिकच्या

Government Employees Retirement : निवृत्तीचं वय अन् महागाई भत्ता, दोन्ही वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं?

SCROLL FOR NEXT