vishakha subhedar, ganesh acharya, vishakha subhedar comedy SAKAL
मनोरंजन

Vishakha Subhedar: चक्क बॉलीवूड डान्सर गणेश आचार्य विशाखाचा दिवाना, काय म्हणाला बघा ..

विशाखा सुभेदार यांची गेली अनेक वर्ष प्रचंड फॅन फॉलोईंग आहे

Devendra Jadhav

अभिनेत्री आणि कॉमेडी क्वीन अशी ओळख असलेल्या अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार. विशाखा सुभेदार यांची गेली अनेक वर्ष प्रचंड फॅन फॉलोईंग आहे. विशाखा सुभेदार सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात. विशाखा सुभेदार यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता चक्क डान्स कोरिओग्राफर गणेश आचार्य यांनी विशाखाचं कौतुक केलंय.

विशाखा सुभेदार यांनी काही दिवसांपुर्वी हुआ छोकरा जवान रे या हिंदी गाण्यावर एक रील व्हिडिओ सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. विशाखा सुभेदार यांच्या या डान्स रीलला त्यांच्या फॅन्सनी तुफान प्रतिसाद दिला. विशाखा यांच्या डान्सचा फॅन आता बॉलिवूड सुप्रसिद्ध कोरीओग्राफर गणेश आचार्य सुद्धा झालाय. गणेश आचार्यने विशाखा यांच्या या डान्स रील खाली, "superb, गॉड ब्लेस यु" अशी कमेंट गणेश आचार्यने केली आहे.

गणेश आचार्यची कमेंट येताच विशाखा यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांनी त्या कमेंटचा स्क्रिनशॉट सोशल मिडीयावर पोस्ट केला. आणि म्हणाल्या,"आईशपथ... गणेश आचार्य ह्यांची कमेंट. अरे आज तो दिन बन गया रे" अशाप्रकारे डान्सची दखल स्वतः गणेश आचार्य यांनी घेतल्याने विशाखा यांना खूप आनंद झाला.

गेली कित्येक वर्ष 'फू बाई फू', 'हास्य जत्रा' अशा कार्यक्रमातून तर नाटक आणि चित्रपटातून आपलं मनोरंजन करणारी, आपल्याला हसवणारी अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार.काही महिन्यांपूर्वीच विशाखाने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाला रामराम करून एका नव्या प्रवासाला सुरुवात केली. सध्या ती 'स्टार प्रवाह' वरील 'शुभविवाह' या मालिकेत आत्याबाईच्या भूमिकेत दिसत आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रम सोडल्यावर विशाखा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या फॅन्सच्या सतत संपर्कात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाई, भलताच 'डेअरिंग'बाज निघाला... मॅच अर्ध्यावर सोडून लंडनसाठी पकडले विमान, १० खेळाडूंसह संघाला खेळावे लागले अन्...

SSC & HSC : गुणपत्रक, प्रमाणपत्र आता एकच; दहावी-बारावीबाबत राज्य शिक्षण मंडळाचा निर्णय

LSG vs DC Live: अर्जुन तेंडुलकरचे पदार्पण झाले? रिषभ पंतने जाहीर केली प्लेइंग इलेव्हन, अक्षर पटेलने जिंकला टॉस अन्...

RTE Admission : ‘आरटीई’साठी २ लाख ८८ हजार अर्ज; ऑनलाइन सोडत, प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक स्वतंत्रपणे होणार जाहीर

तब्बल १२ वर्षांनी छोट्या पडद्यावर परत येतोय झी मराठीचा नायक; नावही तेच; प्रेक्षकांनी पाहताच ओळखलं

SCROLL FOR NEXT