Did Varun Dhawan just dropped hint at kriti sanon and prabhas affair, video viral Esakal
मनोरंजन

Viral Video: प्रभास आणि क्रिती सननचं नातं कन्फर्म; वरुण धवननं दिली मोठी हिंट, म्हणाला...

वरुण धवन आणि क्रिती 'झलक दिखला जा' च्या सेटवर 'भेडिया'चं प्रमोशन करण्यास गेले होते तेव्हा बोलता-बोलता वरुणनं क्रिती-प्रभासच्या नात्याचं सीक्रेट ओपन केलं.

प्रणाली मोरे

Prabhas And Kriti Sanon Affair: प्रभास आणि क्रिती सनन मध्ये काहीतरी सुरू आहे याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून जोरदार पसरल्या आहेत. 'आदिपुरुष' सिनेमातील ही रील लाइफ जोडी रिअल लाइफमध्येही एकत्र येणार का असा प्रश्न सध्या सगळ्यांच्याच मनात आहे. जर क्रितीआणि प्रभासचे चाहते म्हणून तुम्हाला याचं उत्तर माहित करुन घ्यायचं असेल तर वरुण धवननं ते काम अगदी चोख पार पाडलंय,त्यानं एका रिअॅलिटी शो मध्ये यावर मोठी हिंट दिली आहे. वरुण आणि क्रिती 'भेडिया' सिनेमाच्या प्रमोशनसाठी 'झलक दिखला जा..' च्या सेटवर पोहोचले होते,त्याचवेळी वरुणनं प्रभास आणि क्रितीच्या रिलेशनची पोलखोल केली आहे.(Did Varun Dhawan just dropped hint at kriti sanon and prabhas affair, video viral)

शो मध्ये वरुण धवनने क्रिती सननच्या लव्ह लाईफचे अनेक सीक्रेट्स ओपन केले आहेत. बोलता बोलता वरुण धवने प्रभास सोबतच्या क्रितीच्या नात्याला कन्फर्म केले आहे. शो मध्ये वरुण धवनने करण जोहरला विचारलं की माधुरी दिक्षित व्यतिरिक्त कोणत्या अभिनेत्रीला इतकं सुंदर दिसायचा अधिकार नाही? पर्याय दिले होते-काजोल,रानी,आलिया,करीना आणि दीपिका. याचं उत्तर देताना करण जोहरने दीपिका पदूकोणचं नाव घेतलं. तेव्हा करण जोहर वरुणला म्हणाला,'त्याच्या लिस्ट मध्ये कृती सनन का नव्हती?'. तेव्हा क्रिती देखील रिअॅक्ट होते आणि म्हणते,'मी देखील हाच प्रश्न विचारणार होते.माझं नाव का नाही म्हणून'.

तेव्हा वरुण धवन म्हणतो, ''क्रितीचे नाव लिस्टमध्ये या कारणाने नाही कारण तिचं नाव कोणाच्या तरी मनात आहे''. मग करणचं तो,त्यानं संधी साधत प्रश्न विचारलं की,''कोणाच्या मनात आहे तिचं नाव?'' तेव्हा वरुण उत्तर देत म्हणतो,''एक माणूस आहे जो सध्या मुंबईत नाही,तो यावेळी दीपिका पदूकोण सोबत शूटिंग करत आहे''. बस्स..झाली की सगळी पोलखोल. वरुण धवनचं हे उत्तर ऐकून क्रिती देखील गोड हसताना दिसली. तर करण जोहर मात्र हैराण वाटला. वरुण धवननं ही गोष्ट बोलून कुठे ना कुठे क्रिती आणि प्रभासच्या नात्यावर शिक्कामोर्तब केलं. कारण तो प्रभासच आहे जो यावेळी दीपिका पदूकोण सोबत 'प्रोजेक्ट K' चं शूटिंग करत आहे. क्रिती आणि प्रभास यांचा 'आदिपुरुष' सिनेमा लवकरच रिलीजच्या वाट्यावर आहे. ज्यामध्ये प्रभास प्रभुरामचंद्र आणिक्रिती सीतेच्या भूमिकेत दिसणार आहेत.

वरुण धवननं आता क्रितीआणि प्रभासच्या अफेअरची हिंट दिल्यानं चर्चा मात्र जोरदार सुरू झाली आहे. कदाचित तुम्हाला आठवत असेल तर क्रितीनं देखील याआधी प्रभास सोबतच्या नात्यावर हिंट दिली होती. एका मुलाखतीत झालेल्या रॅपिड फायर राऊंडमध्ये क्रिती सनने म्हटलं होतं की, तिला प्रभासशी लग्न करायला आवडेल. प्रश्न होता,कार्तिक आर्यन,टायगर श्रॉफ आणि प्रभास यापैकी कोणाशी लग्न करायला तिला आवडेल? तेव्हा क्रितीनं प्रभासचं नाव घेतलं होतं. पण आता वरुण धवनच्या हिंटमुळे प्रभास-क्रितीचे चाहते मात्र भलतेच खूश झालेयत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rain Alert : घाटमाथ्यापासून विदर्भापर्यंत मुसळधार पाऊस धडकणार; 'या' 17 जिल्ह्यांत यलो अलर्ट; आजचा दिवस ठरणार धोकादायक?

Maratha Reservation: सीएसएमटी स्थानकात आंदोलकांची मोठी गर्दी, रुळावरही उतरले; हलगी वाजवत निषेध व्यक्त

Live Breaking News Updates In Marathi: जरांगेंच्या आंदोलनावर हायकोर्टात सुनावणी

Online Gaming Bill: ही कंपनी आपल्या 60 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार; सीईओ म्हणाले- 'आता पर्याय नाही...'

Manoj Toomu Meta : 23 वर्षांच्या भारतीय इंजीनियरला साडेतीन कोटी पगार, 'या' खास कौशल्यामुळे मेटाने त्याला दिली नोकरीची ऑफर

SCROLL FOR NEXT