मनोरंजन

आलियानं शेयर केला कंडोम मशीनचा फोटो, चाहते म्हणाले....

बॉलीवूडमध्ये आगळ्या वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपचे नाव घेतले जाते.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - बॉलीवूडमध्ये आगळ्या वेगळ्या धाटणीचा दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यपचे नाव घेतले जाते. त्यानं आजवर केलेल्या चित्रपटांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्याचे चाहते केवळ भारतातच नाही तर जगभर पसरले आहेत. सध्या त्याची मुलगी आलिया कश्यप ही सोशल मीडियावर ट्रेडिंगचा विषय आहे. ती नेहमीच तिच्या हटके फॅशनसाठी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं आपले सोशल मीडियाचे अकाउंट हॅक झाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तिचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा किसिंगचा फोटोही व्हायरल झाला होता. त्यावरुन तिला ट्रोल करण्यात आले होते. आताही ती ट्रोल होत आहे त्याचे कारण तिनं शेयर केलेला एक फोटो.

फिल्ममेकर अनुराग कश्यपची मुलगी आलिया ही सध्या फ्रान्समध्ये आहे. तिथे ती पर्यटनासाठी गेली आहे. यावेळी तिनं तिथल्या एका रस्त्यावर असणाऱ्या कंडोम व्हेंडिंग मशीनचा फोटो शेयर केला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी तिच्या बिनधास्तपणाचे कौतूक केले आहे. दुसरीकडे काही जणांनी तिला ट्रोल केले आहे. आलिया तिच्या बोल्डनेससाठी चर्चेत असते. सोशल मीडियावर तिनं यापूर्वी अनेक बोल्ड व्हिडिओ आणि फोटोही शेयर केले आहेत. आता तिचे फ्रान्स ट्रीपचे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्या फोटोंमध्ये तिनं फ्रान्समधील वेगवेगळ्या ठिकाणचे फोटोही शेयर केले आहेत.

आलियानं ते फोटो शेयर करताना लिहिलं आहे की, मी ज्या ज्या ठिकाणी गेले त्याचे फोटो चाहत्यांसाठी शेयर करत आहे. त्यामध्ये संग्राहालयाचे फोटो आहेत, हॉटेल्स आहेत, आणि हो कंडोम व्हेंडिंग मशीन्सचे देखील आहेत. त्या फोटोंना युझर्सनं वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट दिल्या आहेत. आलिया यापूर्वी देखील तिच्या हॉट फोटो आणि व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. ट्रोलर्स आपल्याला काय म्हणतात याचा ती फारसा विचार करत नाही. आलियानं यावेळी एक तिचा बोल्ड अंदाजही शेयर केला आहे. तिनं शेयर केलेल्या बिकीनी फोटोमुळे तिला धमकी देखील मिळाली आहे.

आलियानं आपल्या नावाचा एक युट्युब चॅनेल सुरु केला आहे. त्याला चाहत्यांचा प्रतिसादही मिळाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी ट्रोलही केले होते. त्यावर आलियानं आपली भूमिका मांडली होती. आलिया तिच्या पर्सनल रिलेशनशिपवरुनही अनेकदा ट्रोल झाली आहे. त्यामध्ये अनुरागला मध्यस्थी करावी लागली होती. कंडोम व्हेंडिंगमशीनचा फोटो शेयर केल्यानं चाहत्यांनी तिला गंमतीशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये एकानं अशाप्रकारचे फोटो शेयर करुन तुला काय सांगायचे आहे, दुसऱ्यानं भारतात अजून एवढी प्रगती नाही. अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह नाशिकमध्ये CNG दरात वाढ, नवे दर आजपासून लागू

Ebola Case: काळजी वाढवणारी बातमी! काँगोहून आला अन् तब्येत बिघडली… अहमदाबादमध्ये इबोलाच्या संशयाने खळबळ, ४ जण आयसोलेट

‘८ वाजून १३ मिनिटे’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित; सुनील बर्वे–ऐश्वर्या नारकर यांची दमदार केमिस्ट्री चर्चेत!

Latest Marathi News Live Update : विदर्भात ६ जिल्ह्यांना उष्णतेचा रेड अलर्ट

Monsoon Gains Momentum : मॉन्सूनने पुन्हा घेतली गती; अरबी समुद्र अन् बंगालच्या उपसागरातून पुढे सरकला; हवामान विभागाची माहिती

SCROLL FOR NEXT