ram gopal varma news  esakal
मनोरंजन

Ram Gopal Varma: 'द्रौपदी राष्ट्रपती तर पांडव कोण?' BJP कडून तक्रार

बॉलीवूड फिल्ममेकर राम गोपाल वर्मा हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहे.

युगंधर ताजणे

Ram Gopal Varma Tweet: बॉलीवूड फिल्ममेकर राम गोपाल वर्मा हे नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे सेलिब्रेटी आहे. वादग्रस्त (Bollywood Director News) चित्रपटांबरोबरच सतत चर्चेत राहण्यासाठी राम गोपाल वर्मा सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतात. आता त्यांनी केलेलं एक वक्तव्य भलतचं चर्चेत आलं आहे. त्यांनी थेट राष्ट्रपतीचे पदासाठीच्या (BJP News) उमेदवार द्रौपदी मुर्म (Draupadi Murmu) यांच्यावर टीका केली आहे. त्या टीकेनंतर भाजपनं त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार केली आहे. एनडीएच्या वतीनं मुर्म यांनी राष्ट्रपतीपदासाठी अर्ज केला आहे. त्यावरुन वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

रामगोपाल वर्मा यांच्या त्या व्टिटनंतर बीजेपीनं हैद्राबागद येथील एका पोलीस (Viral News) ठाण्यामध्ये त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांचे म्हणणे आहे की, आम्ही लवकरच वर्मा यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करणार आहोत. राम गोपाल वर्मा यांनी आपल्या व्टिटमधून एक प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामध्ये ते म्हणतात, जर द्रौपदी राष्ट्रपती आहे तर मग पांडव कोण आहे, याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे कौरव कोण आहेत, या ट्विटनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाद सुरु झाला होता.

बीजेपीचे नेते नारायण रेड्डी यांनी त्या व्टिटची दखल घेत हैद्राबाद पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांकडे तक्रार दिली आहे. यापूर्वी देखील वर्मा यांनी सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वेगवेगळ्या प्रकारचे ट्विट करुन लक्ष वेधून घेतले होते. विशेषत; दिल्लीमध्ये जेव्हा पंजाबमधील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केले होते त्यावरुन वर्मा यांच्या सोशल मीडियावर पोस्ट या चर्चेत आल्या होत्या.

रेड्डी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, वर्मा यांच्या त्या वक्तव्यामुळे एससी आणि एसटी समुदायाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यांचा अपमान झाला आहे. त्यामुळे आम्ही पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT