Dream Girl 2 Ayushmann Khurrana Esakal
मनोरंजन

Dream Girl 2 : गर्लफ्रेंडच्या पप्पांमुळे प्रॅक्टिस झाली.. आयुष्यमानने सांगितला ड्रीम गर्लचा मजेदार किस्सा..

या चित्रपटात आयुष्मान पूजाच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान आयुष्मान खुरानाने स्वतःबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

Vaishali Patil

 Dream Girl 2 Ayushmann Khurrana: बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आयुष्मान खुराना हा त्याच्या वेगळ्या धाटणीचे चित्रपट आणि अभिनयामुळे ओळखला जातो. कमी काळात त्याने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. सध्या तो त्याच्या 'ड्रीम गर्ल 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

नुकतच या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर रिलिज करण्यात आला आहे जो प्रेक्षकांना तुफान आवडला आहे. आता आयुष्मान या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

या चित्रपटात आयुष्मान पूजाच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. अलीकडेच एका मुलाखतीदरम्यान आयुष्मान खुरानाने स्वतःबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

पूजाची भूमिका साकारण्यासाठी आयुष्मान कशी तयारी केली याबाबत सांगतांना आयुष्यामनं सांगितलं की, 'या चित्रपटात मुलीच्या आवाजात बोलण्यासाठी मला रेडिओ जॉकी आणि थिएटरच्या कामामुळे मला खूप मदत झाली. मी जेव्हा रेडिओ स्टेशनवर काम करत होतो तेव्हा मी अनेक वेळा महिलांच्या आवाजात प्रँक कॉल करायचो.'

यासोबतच आयुष्मानने आणखी एक मजेशीर गोष्ट सांगितली. तो म्हणाला की, जेव्हा तो त्याच्या गर्लफ्रेंडच्या घरी फोन करायचा तेव्हा तिचे वडील फोन उचलायचे तर तो त्यांच्याशी तिच्या मैत्रिणीच्या आवाजात बोलायचा.

या चित्रपटात आयुष्मान खुराना हा मुलीच्या रुपात दिसतोय. तो लोकांचे मनोरंजन करतो आणि फोनवर पूजाचा आवाज काढून लोकांसोबत गप्पा मारतो आणि पैसे कमावतो. नुकतच ड्रीम गर्ल 2 चं दिल का टेलिफोन 2.0 हे गाणे शेवटच्या दिवशी रिलीज झाले आहे. या गाण्यात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडेची मस्ती पाहायला मिळत आहे, तर पूजाचा जबरदस्त डान्सही दिसत आहे.

या चित्रपटात आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे यांच्याशिवाय परेश रावल, विजय राज, राजपाल यादव, अभिषेक बॅनर्जी, अन्नू कपूर, मनोज जोशी आणि असरानी हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. अशा परिस्थितीत या चित्रपटाबाबत चाहते खूप उत्सुक आहेत.

तर 'ड्रीम गर्ल' हा चित्रपट 2019 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला या चित्रपटात आयुष्मानसोबत नुसरत भरुचा मुख्य भूमिकेत दिसली होती. आता 'ड्रीम गर्ल 2' हा चित्रपट 25 ऑगस्टला थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Capital IPO: 'टाटा'च्या आयपीओचा धमाका! सामान्यांसाठी खुला होण्यापूर्वीच बड्या कंपन्यांची मोठी गुंतवणूक

Arattai messaging app : स्वदेशी मेसेजिंग ॲप ‘Arattai’ची क्रेझ वाढली! ; आता आनंद महिंद्रांनीही केलंय डाउनलोड

Barshi Crime : बार्शीत एसटी महामंडळ बसच्या महिला वाहकास मारहाण; सहा महिलांविरुद्ध गुन्हा

Akola News : खदान पोलीस स्टेशनमधील नितीन मगर निलंबीत, डीबी स्कॉडवर पुन्हा संशयाची सावली

Latest Marathi News Live Update: कोरडेवाडी साठवण तलावाच्या मंजुरीसाठी राजश्री राठोड यांचे आमरण उपोषण

SCROLL FOR NEXT