vijay gilani 
मनोरंजन

बॉलीवूडचे दिग्गज निर्माते विजय गलानी यांचे निधन

बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते विजय गलानी (Vijay Galani) यांचे निधन झाले आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते विजय गलानी (Vijay Galani) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच बॉलीवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या घराकडे धाव घेतली आहे. वयाच्या अवघ्या 50 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. विजय हे गेल्या काही दिवसांपासून कॅन्सरशी झुंजत होते. या आजारावर उपचार करण्यासाठी ते लंडनलाही गेले होते. मात्र त्याचा फारसा काही उपयोग झाला नाही. गलानी यांच्या निधनानंतर बॉलीवूडमध्ये शोककळा पसरली आहे. गलानी यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

विजय गलानी यांच्याबाबत अधिक माहिती द्यायची झाल्यास ते एक लोकप्रिय निर्माते होते. त्यांनी बॉलीवूडला वेगवेगळया प्रकारच्या सुपरहिट्स फिल्म्स दिल्या. त्यामद्ये सलमान खानच्या वीर आणि अक्षय करिना कपूरच्या अजनबी चित्रपटांचा देखील समावेश आहे. बचके रहना रे बाबा, सूर्यवंशी चित्रपटांची निर्मिती देखील त्यांनी केली होती. सलमान खान, अक्षय कुमार सारख्या वेगवेगळ्या सेलिब्रेंटींसोबत त्यांनी काम केले आहे. बॉलीवूडमध्ये मोठं प्रस्थ असणाऱ्या गलानी यांच्या जाण्यानं अनेक सेलिब्रेटींनी शोक व्यक्त केला आहे. त्यांना आदरांजली वाहिली आहे

गोविंदा आणि मनीषा कोईराला यांचा अचानक नावाचा चित्रपट देखील गलानी यांनी प्रदर्शित केला होता. त्यालाही प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. 2021 मध्ये त्यांनी विद्युत जामवालला घेऊन द पावर नावाचा चित्रपट तयार केला होता. तो त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. प्रख्यात निर्माते रमेश तौरानी यांनी विजय यांचा फोटो सोशल मीडियावर शेयर करुन त्यांच्याप्रती आदरांजली वाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Kantara Chapter 1: ‘कांतारा-चॅप्टर १’ मध्ये दिलजीत दोसांझची एंट्री

Tokyo World Athletics 2025: जागतिक ॲथलेटिक्समध्ये तेजस शिरसेची उपांत्य फेरी थोडक्यात हुकली

Kolhapur Bhakt Niwas Scam : भक्त निवास म्हणून दाखवल्या शाळेच्या खोल्या, निधीचा गैरवापर; माहितीच्या अधिकारात धक्कादायक माहिती, मुख्य सूत्रधार कोण?

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

SCROLL FOR NEXT