Amey Khopkar News  esakal
मनोरंजन

Ameya Khopkar: 'जर भारतात पाकिस्तानी कलाकार दिसला तर...' मनसेच्या खोपकरांचा इशारा

खोपकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बॅालिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय.

सकाळ डिजिटल टीम

Bollywood Industry not allowed pakistani actors MNS: बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या पाकिस्तानी कलाकारांनी मोठी लोकप्रियता मिळवल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये गायक, अभिनेते, लेखक यांचाही मोठा सहभाग आहे. आपल्याकडे अदनान सामी, फवाद खान, प्रसिद्ध गायक अतिफ अस्लम या कलावंतांना भलेही भारतातून प्रतिसाद मिळत असला तरी यापुढील काळात भारतामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानी कलाकार दिसता कामा नये. असा इशारा मनसेनं दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत पाकिस्तानी कलाकारांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. यापुढील काळात बॉलीवूडमध्ये पाकिस्तानी कलाकार दिसता कामा नये. असे खोपकर यांनी म्हटले आहे. त्यांनी शेयर केलेल्या पोस्टला सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

हेही वाचा - शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

खोपकर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, बॅालिवूडमधील काही निर्मात्यांना पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांचा पुळका आलाय, असं कानावर येतंय. ही नीच प्रवृत्ती वेळोवेळी ठेचावीच लागते, म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही स्पष्ट शब्दात इशारा देतोय की फक्त मुंबईच काय, हिंदुस्थानातील कोणत्याही भाषेतल्या कलाकृतीत पाकिस्तानी कलाकार दिसला तर त्याचे गंभीर परिणाम संबंधित निर्मात्यांना भोगावे लागतील.

खोपकर यांच्या त्या व्टिटनं आता सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रियांना उधाण आले आहे. काहींनी त्यांना सपोर्ट करत त्यांच्या भूमिकेचे कौतूक केले आहे तर अनेकांनी त्यांच्या भूमिकेवर त्यांना प्रश्न विचारले आहेत. गेल्या काही वर्षांपासून बॉलीवूडमध्ये पाकिस्तानी कलाकार मोठ्या प्रमाणावर येत असल्याचे दिसून आले आहे. त्यांचा वाढता प्रभाव यावर मनसेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जयपूरमध्ये थरार! १२० किमीचा वेग, मद्यधुंद चालक अन् दोन कारमध्ये शर्यत; 'ऑडी'नं 16 जणांना उडवलं

सोनाली बेंद्रेने केलं दशावतार सिनेमाचं कौतुक ; "आपल्या संस्कृतीशी घट्ट नातं सांगणाऱ्या कथा.."

Latest Marathi News Live Update : पुण्यात मतदारांना आमिष दाखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Agricultural News : द्राक्षांची पंढरी संकटात! अतिवृष्टीमुळे निफाड तालुक्यातील ७० टक्के बागांना फळधारणाच नाही

TRAI चा दणका! स्पॅम कॉल्ससाठी जिओ,एअरटेल,Vi वर १५० कोटींचा दंड; युजर्सच्या 'या' फायद्यासाठी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT