Bollywood: Jacqueline Fernandez trolled after her video on cosmetic surgery goes viral Google
मनोरंजन

Bollywood: कॉस्मेटिक सर्जरीवर हे काय बोलून गेली जॅकलिन?, व्हायरल व्हिडीओ पाहून भडकले लोक...

जॅकलिनने २००६ मध्ये श्रीलंका मिस युनिव्हर्स हा ताज पटकावला होता, याच ब्युटी कॉन्टेस्ट मधला एक व्हिडीओ आता अनेक वर्षांनी व्हायरल होताना दिसत आहे.

प्रणाली मोरे

Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिस बॉलीवूडच्या ब्युटी क्वीन्सपैकी एक आहे. जॅकनिच्या सौंदर्यांवर तिचे चाहते मनापासून फिदा आहेत. अभिनेत्रीनं आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून केली. बॉलीवूड सिनेमांची ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॅकलिनने २००६ मध्ये श्रीलंका मिस युनिव्हर्स हा ताज पटकावला होता, याच ब्युटी कॉन्टेस्ट मधला एक व्हिडीओ आता अनेक वर्षांनी व्हायरल होताना दिसत आहे,ज्यामुळे जॅकलिनला लोक जोरदार ट्रोल करताना दिसत आहेत. (Bollywood: Jacqueline Fernandez trolled after her video on cosmetic surgery goes viral)

श्रीलंका मिस युनिव्हर्सच्या कॉनेस्ट दरम्यान प्रश्नोत्तरांचा राऊंड सुरु असताना जॅकलिनला कॉस्मेटिक सर्जरीवर प्रश्न विचारला गेला होता. याचं जॅकलिननं जे उत्तर दिलं,ते आता व्हायरल होत आहे. जॅकलिननं दिलेलं उत्तर लोकांना खोटं,नाटकी वाटत आहे. आणि यावरवनंच लोक तिला ट्रोल करत आहेत.

कॉस्मेटिक सर्जरीच्या प्रश्नावर जॅकलिननं म्हटलं होतं-''मी असं मानते की कॉस्मेटिक सर्जरी एक अनफेअर अॅडव्हान्टेज आहे, हे खूपच कृत्रिम आहे.आणि एखाद्या ब्युटी पीजेंटमध्ये तर कॉस्मेटिक सर्जरी केलेल्यानं येऊच नये. महिलांचं नैसर्गिक सौंदर्य आपण सेलिब्रेट करायला हवं. कारण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की कॉस्मेटिक सर्जरा कोण अफोर्ड करू शकतं आणि कोणाला याचा खर्च परवडणार नाही. ब्युटी पीजेंट चा कॉस्मेटिक सर्जरीशी दूरदूरपर्यंत संबंध नसला पाहिजे''.

कॉस्मेटिक सर्जरीवर जॅकलिनचा व्हिडीओ व्हायरल होताचा लोकांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. काही लोकांनी जॅकलिनचे समर्थन केले आहे तर काही लोकांनी तिच्या विरोधात आवाज उठवत तिची खिल्ली देखील उडवली आहे. एका नेटकऱ्यानं जॅकलिनला ट्रोल करत लिहिलं आहे की-'हाहा...बघा कोण बोलत आहे'. तर आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की- 'ही आता केवढी वेगळी दिसते'. तर आणखी एकानं लिहिलं आहे-'हिला ओळखायला मला किती वेळ लागला'. आता यावरनं अंदाज लागलाच असेल की जॅकलिननं स्वतः कॉस्मेटिक सर्जरी केली आहे तरी ती त्याच्या विरोधात नाटकी,खोटं बोलताना दिसल्यानं लोक भडकलेयत.

हेही वाचा- Sextortion: भारत ही सेक्सटॉर्शनची जागतिक राजधानी होतेय का

जॅकलिन विषयी बोलायचं झालं तर गेल्या काही दिवसांपासून ती सुकेश सोबतचं नातं आणि मनी लॉन्ड्रिंग केस मुळे चर्चेत आहे. जॅकलिनवर सुकेशकडून करोडोचे गिफ्ट स्विकारल्याचा आणि त्याचे गुन्हे माहित असूनही ते लपवून ठेवल्याचा आरोप आहे. तिच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर नुकतीच ती आपल्याला 'रामसेतू' सिनेमात दिसली होती. जॅकलिन आता रोहित शेट्टीच्या 'सर्कस' सिनेमातही दिसणार आहे,जो पुढील वर्षी रिलीज होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटी सोन्याच्या भावात मोठा बदल! 10 ग्रॅम कितीला? पाहा तुमच्या शहरातील सोनं-चांदीचा ताजा भाव

मोबाईल नाही, पुस्तके वाचा; १८ वर्षांपूर्वी मुलांच्या हातात स्मार्टफोन देऊ नका! नितीश भारद्वाज यांचा पालकांना सल्ला

Live Updates Marathi : आषाढी एकादशीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शुभेच्छा, भक्ती आणि सेवाभावाचा दिला संदेश

Chaturmas 2026 Dos & Don'ts: आजपासून चातुर्मासाला सुरुवात; या काळात काय करावं, काय टाळावं? जाणून घ्या नियम आणि धार्मिक महत्त्व

Commonwealth Games 2026 : भाजी विक्रेता, इ रिक्षा चालक... Jhandu Kumar ने राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला जिंकून दिले पदक

SCROLL FOR NEXT