Suriya Sivakumar esakal
मनोरंजन

'जय भीम'चा हिंदी ट्रेलर रिलीज; साऊथ सुपरस्टार दिसणार वकिलाच्या भूमिकेत

सकाळ डिजिटल टीम

देशभरातून 'जय भीम' सिनेमा हिंदीत सुद्धा रिलीज करण्यात यावा, अशी मागणी चाहत्यांकडून करण्यात आली होती.

Amazon Prime Video चा बहुप्रतीक्षित चित्रपट 'जय भीम'चा ट्रेलर नुकताच रिलीज झालाय. हा ट्रेलर रिलीज झाल्यापासून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. सुपरस्टार सूर्या (Suriya Sivakumar) अॅक्शन, रोमँटिक सिनेमांसाठी ओळखल्या जातो. मात्र, आता तो एका वेगळ्या थाटणीचा 'जय भीम' (Jai Bhim) चित्रपट घेऊन आलाय. या सिनेमातून सूर्या आपल्या वेगळ्या अभिनयाचं दर्शन त्याच्या चाहत्यांना देणार आहे.

'जयभीम' 2 नोव्हेंबर रोजी अॅमेझॉन प्राइमवर तामिळ भाषेत प्रदर्शित होत असल्याची निर्मात्यांकडून घोषणा करण्यात आली. परंतु, देशभरातून 'जय भीम' सिनेमा हिंदीत सुद्धा रिलीज करण्यात यावा, अशी मागणी चाहत्यांकडून अॅमेझॉन आणि निर्मात्यांकडे करण्यात आली होती. पण, याची आता प्रतीक्षा संपली असून या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आलाय.

न्यायाच्या विरुद्धचा लढा दाखवणारा 'जय भीम' चित्रपट एक कोर्ट रूम ड्रामा असून अभिनेता यात एका वकिलाच्या भूमिकेत दिसेल. हिंदी आणि दक्षिण भारतातील प्रसिद्ध अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) देखील महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमाचं दिग्दर्शन लेखक-पत्रकार असलेले टी. जे. नानवेल (T. J. Gnanavel) यांचं आहे, तसेच चित्रपटाचं निर्माण अभिनेता सूर्यायानं पत्नी ज्योतिका (Jyotika) सोबत केलंय. हा चित्रपट 90 च्या दशकात तामिळनाडूमध्ये घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar : १४ आक्षेप, १६.१० लाख अपील... निवडणूक आयोगात पडद्यामागे काय घडलं? ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये उज्ज्वल निकम यांनी जिंकली प्रेक्षकांची मन, जिंकलेली रक्कम दान करण्याचा निर्णय

Gokul Election: ‘कप-बशी’ चिन्हासाठी प्रतिष्ठेची लढाई;सतेज पाटील गटाचा पहिला, त्यानंतर महायुतीचा अर्ज

Maharashtra Ganesh Visarjan Live: मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीत स्व-रूपवर्धिणी मल्लखांब पथकाचे थरारक सादरीकरण

Gyanesh Kumar Resignation : कॉकरोच जनता पार्टी निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात रस्त्यावर उतरणार; गांधी जयंतीला देशव्यापी आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT