janhvi kapoor
janhvi kapoor Esakal
मनोरंजन

janhvi kapoor: 'रोहितच्या जागी जान्हवीला खेळायला पाठवा', ती मैदानात उतरली अन् नेटकऱ्यांनी केल्या भन्नाट कमेंट

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर मागील काही दिवसांपासून तिच्या मिमि या चित्रपटामूळे चर्चेत होती. तिचा ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर बऱ्या प्रमाणात चालला. पण सध्या तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात ती मैदानावर क्रिकेट खेळतांना दिसत आहे.

तिचा हा फोटो तिच्या आगामी सिनेमा 'मिस्टर अँड मिसेस माही' याच्याशी संबंधित आहे. या फोटोत ती हातात बॅट धरून मैदानावर सराव करताना दिसत आहे. जान्हवी कपूर मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटात क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या सेटवरील तिचा पहिला फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत तिने लिहिले आहे की, "एक मिनिट झाला. " यासह, तिने बॅट आणि बॉलचे इमोजी शेअर केले आणि हॅशटॅगसह चित्रपटाचं नाव देखील लिहिलयं. तिने हातात ग्लोव्हज घातलेली बॅट धरली आहे. तिच्या खांद्यावर पट्टी लावलेली आहे.

हेही वाचा: काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

जान्हवीच्या या पोस्टवर यूजर्स भन्नाट कमेंट देत आहे. एका यूजरने विराटला सॉरीही म्हटले आहे. एका चाहत्याने जान्हवीचे कौतुक करत लिहिले, 'सॉरी विराट जान्हवी माझी आवडती क्रिकेटर आहे.' दुसऱ्या एका चाहत्याने 'सर्वोत्तम क्रिकेटर' अशी कमेंट केली. एकाने लिहिले, "केएल राहुलची जागा सापडली." तर एकानं तिला रोहितच्या जागी खेळण्याची संधी द्यावी अशी विंनतीच केली आहे. आतापर्यंत या फोटोला 6 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे.

जान्हवी कपूरने 'धडक' (2018) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर ती 'गुंजन सक्सेना', 'घोस्ट डायरी', 'रुही', 'गुड लक जेरी' आणि 'मिली' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसली. आता तिच्या कामात पूर्वीपेक्षा जास्त सुधारणा झाली आहे. आता तिने 'मिस्टर अँड मिसेस माही' या स्पोर्ट्स सिनेमाची तयारी सुरू केली आहे. या चित्रपटात राजकुमार राव देखील आहेत. दोघांनी यापूर्वी 'रुही'मध्ये एकत्र काम केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT