Tehran movie news esakal
मनोरंजन

Tehran: जॉन अब्राहमचा 'तेहरान'! शाहरुखच्या 'पठाण'ला टक्कर

बॉलीवूडचा अभिनेता जॉन अब्राहम हा त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे.

युगंधर ताजणे

Jon Abraham movies: बॉलीवूडचा अभिनेता जॉन अब्राहम हा त्याच्या वेगळेपणासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. त्यानं नेहमीच आपल्या हटके स्टाईलनं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मोठ्या संघर्षातून आलेल्या जॉननं (bollywood movies news) आपला स्वतंत्र चाहतावर्ग तयार केला आहे. सध्या जॉनच्या नव्या चित्रपटाची चर्चा आहे. त्याचं नाव तेहरान असं असून त्याचा टीझर व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांना तो टीझर कमालीचा आवडला आहे. आता (social media news) तेहरानचा सामना शाहरुखच्या पठाणशी होणार आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये कोण बाजी मारणार असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे.

जॉन त्याच्या एक व्हिलन रिटर्न्सच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यात अर्जुन कपूर, तारा सुतारिया, दिशा पटानी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. त्यातच जॉननं (viral news) त्याच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याचा फर्स्ट लूक देखील नेटकऱ्यांना भावला आहे. तेहरानच्या शुटींगला सुरुवात झाली आहे. मॅडॉक फिल्म्सनं या चित्रपटाची निर्मिती केली आहे. जॉननं सोशल मीडियावरुन त्याविषयी माहिती दिली आहे. त्यानं शेयर केलेल्या व्हिडिओला त्याच्या चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या काही सेकंदाच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मॅडॉक फिल्म्सच्या वतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून त्यांनी तो व्हिडिओ शेयर करताना लिहिलं आहे की, लाईट, कॅमेरा आणि थोडीशी अॅक्शन यांच्यासोबत तेहरानची शुटींग सुरु केली आहे. जॉननं तो व्हिडिओ त्याच्या इंस्टावरुन शेयर केला आहे. जॉनचा तेहरान हा एक अॅक्शन थ्रिलर मुव्ही आहे. जो सत्य घटनांवर आधारित आहे. त्याचे दिग्दर्शन अरुण गोपालन यांनी केले आहे. चित्रपटाचे लेखन रितेश शहा आणि आशिष वर्मा यांनी केले आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

जॉनच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास, त्याचा काही दिवसांपूर्वी अॅटॅक नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. मात्र तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला. आता हा चित्रपट ओटीटीवर देखील आला आहे. जॉनचा एक व्हिलन रिटर्न्स प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तो 29 जुलैला प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT