Vicky-Katrina Esakal
मनोरंजन

Katrina-Vicky wedding anniversary: रबने नव्हे तर 'कॉफी विथ करण'ने बनवली जोडी...

लोकप्रिय जोडी कतरिना कैफ आणि विकी कौशल आज पहिल्या लग्नाच्या वाढदिवस साजरा करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूडमधील पॉवर कपल्सपैकी आणि लोकप्रिय जोडी कतरिना कैफ आणि विकी कौशल आज पहिल्या लग्नाच्या वाढदिवस साजरा करत आहे. हे लव्ह अनेकदा चर्चेत असतात. कधी कतरिना विकीचे फनी व्हिडिओ पोस्ट करते तर कधी विकी... दोघांची केमेस्ट्री खुप चाहत्यांना खुप आवडते.

या दोघांनीही त्याचं नातं सगळ्यांपासून लपवून ठेवलं होतं. लग्नाची बातमी येईपर्यंत कुणालाही याची भनक लागू दिली नाही. आज त्यांच्या लग्नाला दोन वर्ष झाली. दोघांचं प्रेम कसं जूळलं हे तुम्हाला सांगतो.

कतरिना आणि विकीची लव्हस्टोरी खूपच मजेदार आणि रंजक आहे. दोघांनीही लग्न होईल असं कधीच वाटलं नव्हतं. दोघांच्या नात्याला सुरुवात झाली ती करण जोहरच्या कॉफी विथ करण या चॅट शोमध्ये. विकी जेव्हा करणच्या शोमध्ये आला तेव्हा करणने त्याला सांगितले की कतरिनाला त्याच्यासोबत काम करायचयं आहे.

कारण दोघेही ऑनस्क्रीन एकत्र चांगले दिसतील असं कतरिनाला वाटते आहे. हे ऐकून विकीला एकप्रकारे शॉकचं लागला. त्याच्या आनंदाला सीमाचं नव्हती. त्याने बेशुद्ध होण्याचे नाटक केले.

यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफ एका शोमध्ये भेटले. जिथ होस्ट नव्हता तर टेप रेकॉर्डरमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना द्यावी लागणार होती. तेव्हा विकीने कतरिनाला विचारलं की, त्यांची पहिली भेट रेकॉर्ड होईल असं तिला कधी वाटलं होतं का? यावर कतरिना म्हणाली होती, एखाद्याला ओळखण्यासाठी ही चांगली जागा आहे.

तर कॉफी विथ करणच्या पूढच्या कतरिना कैफने तिची प्रेमकहाणी सर्वांना सांगितली. कतरिना म्हणाली होती, विकी माझ्या रडारवर कधीच नव्हता. मी नुकतचं विक्कीचं नाव ऐकलं होतं आणि मला त्याच्याबद्दल फारशी माहितीही नव्हती.

आमची ना कधी भेट झाली ना कधी बोलणं झालं. पण झोया अख्तरच्या पार्टीत जेव्हा मी विकीला भेटले तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडले. कतरिनाने सर्वात आधी झोयाला तिच्या भावना सांगितल्या होत्या. झोयाच्या पार्टीनंतर दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते.

अशाप्रकारे दोघांच्या प्रेमाला सुरवात झाली . विकी आणि कतरिनाला त्यांच्या कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थीतीत गुपचूप लग्न करायचं होते. पण हळूहळू लग्नाची बातमी समोर आली. यानंतर दोघांनीही मुंबईपासून दूर राजस्थानमधील बरवाडा येथील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये शाही पद्धतीने लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

26/11 Mumbai Attack 18th Anniversary : लाठी घेऊन कसाबच्या गोळ्या अंगावर झेलणारे तुकाराम ओंबळे अन् 'ती' ६० तासांची काळी रात्र! १८ वर्षांनंतरही मुंबईच्या जखमा ताज्या; तहव्वुर राणाच्या प्रत्यार्पणानंतर कुठवर पोहोचला न्याय?

Meta Congress Meeting Controversy : 'मेटा भाजप का बेटा', मेटा-काँग्रेस बैठकीत जोरदार खडाजंगी! राहुल गांधींच्या पोस्टवर निर्बंध येत असल्याचा काँग्रेसचा आरोप; भारतीय कायद्यांचे पालन करत असल्याचे मेटाचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : पुण्यातील गोळीबारावरून सुप्रिया सुळे आक्रमक; फडणवीसांनी शहराचे पालकत्व घ्यावे!

Space Mission: भारताने इतिहास घडविल्यानंतर तब्बल ४२ वर्षांनी पाकिस्तानचा पहिला अंतराळवीर अवकाशात

ट्रम्प यांचा भारताला पुन्हा दणका? २५ टक्के टॅरिफ लावण्याच्या हालचाली; आणखी ६ देश रडारवर

SCROLL FOR NEXT