मनोरंजन

'बिगडने दे' तून उलगडतो '83' चा थरार; विजयगाथा भारताची

गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते. तो आता थो़ड्याच दिवसांत प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षक ज्या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते. तो आता थो़ड्याच दिवसांत प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 83 या चित्रपटातून पुन्हा एकदा त्या विश्वचषकाच्या आठवणी ताज्या होणार आहेत. कबीर खान दिग्दर्शित, '83' हा निश्चितपणे 2021 च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे, जो भारताच्या 1983 च्या ऐतिहासिक विश्वचषक विजयाची गाथा आपल्याला सांगतो. 'लेहरा दो' लाँच केल्यानंतर, निर्मात्यांनी अलीकडेच रणवीर सिंग आणि इतर प्रतिभावान कलाकारांच्या 'बिगडने दे' चित्रपटातील दुसरे गाणे आता प्रदर्शित झाले आहे.

बेनी दयाल यांनी गायलेले आणि प्रीतम यांनी संगीतबद्ध केलेले हे गाणे भारतीय क्रिकेट संघाचे भावविश्व प्रेक्षकांसमोर उभे करते. आणि त्यांना त्या प्रसंगांची आठवण करुन देते ज्यातून भारतीय संघानं प्रभावी वाटचाल केली होती. या चित्रपटामध्ये रणवीर सिंग आणि त्याच्या टीमने उत्तम प्रकारे अभिनय केला आहे. 'बिगडने दे' आपल्याला टीम इंडियाची तयारी आणि इतिहास रचण्याआधी पडद्यामागील गंमती जमती समोर आणतो. रणवीर सिंह चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. यासोबतच ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटिल, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. दीपिका पादुकोण या चित्रपटात कपिल देव यांची पत्नी रोमीची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

फैंटम फिल्म्स यांच्याद्वारे कबीर खान फिल्म्स प्रोडक्शनच्या 83 ला सादर करण्यात येणार आहे. रिलायंस एंटरटेनमेंट आणि पीवीआर पिक्चर्स चा हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 ला हिंदी, तमिळ, तेलुगु, कन्नड़ आणि मलयाळम मध्ये 3डी रिलीज होणार आहे. कमल हसन यांची राजकमल फिल्म्स इंटरनेशनल, अक्किनेनी नागार्जुन यांची अन्नपूर्णा स्टूडियो, पृथ्वीराज प्रोडक्शंस यांनी चित्रपटाचे अनुक्रमे तामिळ, तेलुगु आणि मलयाळम व्हर्जनकरिता रिलायंस एंटरटेनमेंट सोबत एकत्र आले आहेत. पृथ्वीराज प्रोडक्शन आणि किच्छा सुदीपा यांची शालिनी आर्ट्स फिल्म मलयाळम आणि कन्नड व्हर्जन प्रस्तुत करण्यासाठी तयार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT