bollywood movie crakk teaser out now starring vidyut jammwal arjun rampla nora fatehi amy jackson SAKAL
मनोरंजन

CRAKK Teaser: विद्युत जामवालची तगडी अ‍ॅक्शन असलेला 'क्रॅक'चा चित्तथरारक टीझर भेटीला

विद्युत - अर्जुन रामपालचा नवीन सिनेमा क्रॅक

Devendra Jadhav

CRAKK Teaser News: गेल्या काही दिवसांपासून विद्युत जामवालच्या क्रॅक सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. विद्युत या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे.

अशातच विद्युतच्या 'क्रॅक' सिनेमाचा चित्तथरारक टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या सिनेमाचा टीझर पाहून लोकांनी टीझरला पसंती दर्शवली आहे.

क्रॅक सिनेमातून दिसणार तगडी अ‍ॅक्शन

क्रॅक हा अ‍ॅक्शन सर्व्हायव्हल थ्रिलर आहे, जो भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनोखा आणि महत्वाचा सिनेमा ठरण्याची शक्यता आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये खतरनाक अॅक्शन सीक्वेन्स पाहायला मिळतात. मोठ्या किल्ल्यावरुन खाली उडी मारणं, चालत्या ट्रेनसोबत धावणं अशा अनेक गोष्टी पाहायला मिळत आहेत.

अॅक्शन स्टार विद्युत जामवालसोबत सिनेमात नोरा फतेही, अर्जुन रामपाल आणि एमी जॅक्सन यांची खास भूमिका पाहायला मिळतेय.

क्रॅकचा टीझर पाहून हा सिनेमा युथला आवडणार यात शंका नाही. सिनेमाचे दमदार अ‍ॅक्शन सीन पाहून काळजाचा ठोका चुकतो.

'कमांडो 3' नंतर विद्युत आणि दिग्दर्शक आदित्य दत्त ही डायनॅमिक जोडी 'क्रॅक' निमित्ताने पुन्हा कमबॅक करत आहे. क्रॅकचे टायटल ट्रॅक टीझर आकर्षक होण्यास चांगलीच मदत करतोय.

विद्युत जामवाल आणि अॅक्शन हिरो फिल्म्स निर्मित आणि आदित्य दत्त दिग्दर्शित 'क्रॅक' 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv News: अतिवृष्टीमुळे नुकसान होऊन व कर्जबाजारीपणामुळे भूम तालुक्यातील शेतकऱ्याने संपवले जीवन

Ladki Bahin yojana: बहिणींसाठी ‘ई-केवायसी’ रुसली; ‘कनेक्टिव्हिटी’सह संकेतस्थळ वारंवार बंद होत असल्याने मनस्ताप

ठाण्यात सरकारी जागेवर ३ इमारती बांधल्या, बिल्डरकडून ११२ फ्लॅटधारकांची कोट्यवधींची फसवणूक

अरे वाह! 'या' मराठी अभिनेत्रीचा झाला साखरपुडा, नवरा सुद्धा आहे 'या' मालिकेतील अभिनेता, सोशल मीडियावर फोटोची चर्चा

Latest Marathi News Live Update : दादर प्लाझाजवळ भीषण अपघात, एकाचा मृत्यू,चार जखमी

SCROLL FOR NEXT