मुंबई - शेरशाहमध्ये अभिनेता सिद्धार्थनं कमाल केली होती. त्याचा अभिनयही प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता. त्यामुळे तो लोकप्रिय झाला. त्याला त्या चित्रपटानं स्टार बनवलं. त्यामध्ये त्यानं एका आर्मी अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. कॅप्टन विक्रम बत्रांच्या त्या भूमिकेनं सिद्धार्थनं जाणकार प्रेक्षक, समीक्षक यांचे लक्ष वेधून घेतले होते. शेहशाहनंतर त्याच्याकडे मोठमोठ्या बॅनरचे चित्रपट आले आहेत. तसं झालं नसतं तर नवल म्हणावं लागलं असतं. आता तो मिशन मजनूमध्ये दिसणार आहे. त्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
प्रसिद्ध चित्रपट समीक्षक तरन आदर्श यांनी याबाबत अधिक माहिती सोशल मीडियावर शेयर केली आहे. शेरशाह आणि अजय देवगणचा भूज द प्राईड ऑफ इंडिया एकाच वेळी प्रदर्शित झाला होता. मात्र अजयच्या भुजपेक्षाही सिद्धार्थच्या शेरशाहनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. यामध्ये सिद्धारर्थच्या जोडीला प्रख्यात अभिनेत्री किएरा अडवाणी होती. या दोघांच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांनी पसंत केले. त्यांच्या भूमिकेचं कौतूकही केलं. आता सोशल मीडियावर मिशन मजनूच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पुढील वर्षी म्हणजे 13 मे 2022 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. प्रसिद्ध निर्माते रॉनी स्क्रुवाला गिल्टी बाय असोशिएशन मीडिया यांच्यावतीनं या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे.
या चित्रपटामध्ये सिद्धार्थच्या जोडीला रश्मिका मंदाना दिसणार आहे. आज या चित्रपटाच्या मेकर्सनं चित्रपटाचे एक पोस्टर व्हायरल केले आहे. ते प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे. त्यामध्ये सिद्धार्थच्या लूकला चाहत्यांचा प्रतिसादही मिळाला आहे. पाकिस्तानमध्ये जावून भारताच्या जवानांनी जी साहसी लढाई केली होती त्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये प्रेक्षकांना एका वेगळ्या विषयावरचा चित्रपट पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंतनु बागची यांनी केलं आहे. साधारण 1970 च्या दशकांतील कथानक चित्रपटामध्ये दाखवण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.