Neena Gupta - Malaika Arora Esakal
मनोरंजन

Neena Gupta यांचा 'तो' व्हिडीओ पाहून शिट्टया अन् टाळ्या.. लोक म्हणू लागले,'यांच्यासमोर मलायका म्हणजे..'

नीना गुप्ता यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत वयाच्या ६३ व्या वर्षी बोल्ड ड्रेस घालून ज्या अंदाजात अदाकारी दाखवलीय त्यानं चाहते क्लीन बोल्ड झालेयत.

प्रणाली मोरे

Neena Gupta : बॉलिवूडमध्ये आपल्या दमदार अभिनयासाठी प्रसिद्ध असलेल्या नीना गुप्ता सोशल मीडियावर अनेकदा बोल्ड आणि ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळतात.

नीना गुप्ता वयाच्या ६३ व्या वर्षीही फीट आहेत. नीना गुप्ता यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये त्यांची ड्रेसिंग स्टाइल पाहून चाहत्यांनी भरभरून कौतुक केले आहे ‌

नुकताच नीना गुप्ता यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामधील त्यांच्या अदा पाहून सगळेच अवाक झाले आहेत. मलायकासोबत त्यांची तुलना केली जात आहे. (Bollywood: Neena Gupta Video Viral fan says she challenged to malaika arora)

नीना गुप्ता या व्हिडिओमध्ये काळ्या रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हिडिओ शेअर करताना नीना गुप्ता म्हणाल्या, 'असा ड्रेस घालणे मोठे धाडसाचे कृत्य आहे... आणि मी ते केले!' हा शॉर्ट ड्रेस नीना गुप्ता यांच्यावर खूप छान दिसत आहे आणि या ड्रेसमध्ये त्या ज्या आत्मविश्वासाने चालत आहेत ते देखील आश्चर्यकारक आहे. नीना गुप्तांचा हा व्हिडिओ पाहून अभिनेत्री निम्रत कौरने 'हॉट' अशी प्रतिक्रिया दिली.

त्याचवेळी एका चाहत्याने कमेंटमध्ये लिहिले की, 'मलाही मोठे झाल्यावर असेच मस्त आणि सुंदर व्हायचे आहे.' नीना गुप्ता यांनी त्यांच्या लूकवर प्रयोग करण्याची ही पहिलीच वेळ नाही.

एका युजरने तर नीना गुप्तां समोर चक्क मलायका अरोराला फीकी म्हटले आहे 'नीना गुप्ता समोर मलायका चाय कम पाणी आहे' .

नीना गुप्ता यांची मुलगी मसाबा गुप्ता ही फॅशन डिझायनर आहे आणि नीना अनेकदा त्यांच्या मुलीने डिझाइन केलेले कपडे घालतात.

नीना गुप्ता 2022 मध्ये 'गुडबाय', 'उंचाई' आणि 'वध' सारख्या चित्रपटांमध्ये दिसल्या. 'नीना बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'उंचाई' चित्रपटात भाव खाऊन गेल्या होत्या. नीना आता त्यांच्या आगामी 'ग्वाल्हेर' चित्रपटात दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT