Lagaan movie news  esakal
मनोरंजन

युकेतल्या वेस्टएन्डमध्ये 'लगान'? आमीरकडून ग्रीन सिग्नलची प्रतिक्षा

सर्वोत्तम भारतीय चित्रपटांमध्ये आमीर खानच्या लगानचा समावेश हा आवर्जुन केला जातो.

युगंधर ताजणे

Lagaan Movie: सर्वोत्तम भारतीय चित्रपटांमध्ये आमीर खानच्या लगानचा समावेश हा आवर्जुन केला जातो. ऑस्करसाठी नामांकन (Bollywood movies) झालेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर इतिहास घडवला होता. देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये लगानला प्रेक्षकांचा (Box Office) तुफान प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे नाव बॉलीवूडला माहिती होतं. मात्र लगानपासून त्यांचे नाव (Aamir Khan) अधिक ठळक झाले. लगानमुळे त्यांना जगभर ओळख मिळाली. आता लगानचं एवढं कौतूक करण्याचे कारण म्हणजे या चित्रपटानं या चित्रपटाला 21 वर्षे पूर्ण झाली आहेत.

आता एक नवीन बातमी समोर आली आहे. ती लगानशी संबंधित आहे. (Bollywood Actor) लगानला आता जगातील सर्वात मोठ्या थिएटरमध्ये नाटकाच्या रुपात सादर केले जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. ब्रिटनचे अनेक निर्माते हे आमिरच्या भेटीला गेले होते. यावेळी त्यांनी आमिर आणि त्याच्या प्रॉडक्शन टीमला आपल्याला या चित्रपटाचे नाट्य रुपांतर यासाठी हक्क मिळावेत म्हणून मागणी केली आहे. अजुन त्यावर आमीरकडून कोणत्याही प्रकारचं उत्तर त्यांना गेलेलं नाही. मात्र यानिमित्तानं लगानच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

युकेमधील प्रसिद्ध वेस्टएन्ड थिएटबाबतही लवकर निर्णय होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. न्यूयॉर्कमधील ब्रॉडवे थिएटर प्रमाणेच जगातील सर्वात मोठे थिटएर म्हणून वेस्टएन्डकडे देखील पाहिले जाते. या थिएटरमध्ये देखील लगान सादर केला जाणार असल्याची शक्यता आहे. मात्र त्याविषयी कुठलाही निर्णय अधिकृतपणे झालेला नाही. एएनआयनं केलेल्या ट्विटमध्ये लगान लवकरच युकेच्या वेस्टएन्ड थिएटरमध्ये सादर होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे नेमक्या कोणत्या थिएटरमध्ये हा प्रयोग होणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: संदीप क्षीरसागरांना गळाला लावण्यासाठी अजित पवारांचे जोरदार प्रयत्न? एका दगडात दोन पक्षी टिपण्याचा डाव

Pune News : औषधांची ऑनलाइन, बेकायदेशीरपणे विक्री; औषध विक्रेत्या संघटनांची बंदी घालण्याची मागणी

Eknath Shinde: विरोधकांच्या विरोधाची हंडी जनतेने फोडली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं शरसंधान

Yermala News : संपूर्ण धाराशिव जिल्हा अतिवृष्टीने प्रभावीत झाला असताना राज्य कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा वाशी दौरा दुटप्पी पणाचा

Latest Maharashtra News Updates : मुंबईत दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा जखमी; केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार, काहींची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT