Nora Fatehi trolled for holding flag wrong way fifa world cup 2022 Google
मनोरंजन

Nora Fatehi Video: नाचण्याच्या नादात भारतीय तिरंग्याचा अपमान करुन बसली नोरा.. व्हिडीओ पाहून भडकले नेटकरी

फिफा वर्ल्ड कप २०२२ च्या फॅन फेस्टिव्हलमध्ये नोरानं जबरदस्त डान्स केला खरा पण नेहमीप्रमाणे तिच्या नृत्यावर फिदा न होता तिला ट्रोल केलं जात आहे.

प्रणाली मोरे

Nora Fatehi: केवळ देशातच नाही तर जगभरात नोरा फतेहीचा धमाकेदार डान्स आणि ग्लॅमरस लूकची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. नोराच्या या प्रसिद्धीमुळेच तिला कतारमध्ये फीफा वर्ल्ड कपमध्ये परफॉर्म करण्याची संधी मिळाली. फिफा वर्ल्ड कप २०२२ च्या फॅन फेस्टिव्हलमध्ये नोरानं जबरदस्त डान्स केला. नोरानं स्टेजवर भारताचा तिरंगा फडकवत जोरदार जय हिंदच्या घोषणा देखील दिल्या. पण या दरम्यान नोरानं एक घोडचूक केली,ज्यामुळे तिला ट्रोल केलं जात आहे.(Nora Fatehi trolled for holding flag wrong way fifa world cup 2022)

व्हिडीओमध्ये नोरा फतेही बोलताना दिसतेय की,भारत भले फिफा वर्ल्ड कपमध्ये सहभागी झाला नसेल पण मी एक भारतीय म्हणूनच या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली आहे,आपल्या भारतीय संगीताच्या आणि नृत्याच्या माध्यमातून. नोराचं हे बोलणं ऐकून तिथे उपस्थित सगळ्यांमध्येच उत्साह संचारला. नोरासोबत उपस्थित प्रेक्षकही जय हिंदच्या घोषणा देऊ लागले. संपूर्ण स्टेडियम भारत आणि भारताविषयीच्या सुरु असलेल्या जय हिंदच्या घोषणांनी दणाणून गेला. नोरा भारतीय तिरंगा हातात घेऊन फडकवतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला खरं. पण...

हेही वाचा: आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

नोरावर भारताच्या तिरंग्याला चुकीच्या पद्धतीनं पकडल्याचा,फडकवल्याचा आणि त्याचा अपमान करण्याचा आरोप केला जात आहे. सगळ्यात पहिलं तर नोराला स्टेजवर तिरंगा देताना तो तिच्या दिशेने फेकण्यात आला. स्टेजवर त्यामुळे तो खाली पडला,आणि तो तसाच उचलत नोरा त्याला फडकवताना दिसली,आणि ती ज्या पद्धतीनं तो फडकवत होती ते पाहून वाटत होतं की ती तिरंगा नाही,ओढणी घेऊन मिरवत आहे. आणि सगळ्यात मोठा तिरंग्याचा अपमान तेव्हा झाला जेव्हा नोरानं तो तिरंगा उल्टा पकडला,आणि तसाच फडकवला....आणि नोरा वादात पडली.

नेटकऱ्यांनी तिला जोरदार ट्रोल केलं आहे. एकानं लिहिलं आहे की, 'तिरंग्याला चुकीचं पकडलं आहे'. तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की,'तिरंग्याला ज्या पद्धतीनं तिला दिलं ते खूप अपमानास्पद होतं'. आणखी एका नेटकऱ्यानं लिहिलं आहे की,'नोरानं तिरंग्याचा मान राखला नाही.तिनं त्याचा अपमान केला'. नेटकऱ्यांच्या मते नोराला तिरंगा पकडायचा कसा,फडकवायचा कसा हे देखील माहित नाही. हे खूपच अपमानास्पद आहे. नोराच्या या हरकतीमुळे तिचे चाहते देखील तिच्यावर नाराज झालेले दिसत आहेत. अद्याप नोरानं या ट्रोलिंगवर काहीही उत्तर दिलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT