Bramhastra Movie  esakal
मनोरंजन

Video Viral: का होतोय करण जोहरचा 'ब्रम्हास्त्र' सोशल मीडियावर ट्रेंड?

बॉलीवूडमध्ये कोरोनाचा फटका बसलेल्या चित्रपटांची संख्या मोठी आहे. त्यात टॉलीवूडमधील मेगास्टारर मुव्ही आता प्रदर्शित होत आहेत.

सकाळ ऑनलाईन टीम

Bollywood Movies: बॉलीवूडमध्ये कोरोनाचा फटका बसलेल्या चित्रपटांची संख्या मोठी आहे. त्यात टॉलीवूडमधील मेगास्टारर मुव्ही आता प्रदर्शित होत (Karan Johar) आहेत. बॉलीवूडचे काही चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. त्यामध्ये आता करण जोहरच्या ब्रम्हास्त्रची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसत आहे. (Bramhastra Movie) करणच्या या चित्रपटाची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे. त्यामागील कारण म्हणजे प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांच्या प्रमुख भूमिका यामध्ये आहेत.

बॉलिवुडमध्ये आपल्या रोमॅन्टिक सिनेमांच्या माध्यमातून आगळा ठसा उमटवणारा दिग्दर्शक म्हणजे करण जोहर. करणच्या आगामी ब्रम्हास्त्रचा एक सुरेख व्हीडिओ सध्या 'कू'वर ट्रेंड होतो आहे. करण जोहर सोशल मीडियावर चांगलाच सक्रीय असतो. वैयक्तिक आयुष्यातल्या गंमतीदार गोष्टींसह आगामी प्रकल्पांबाबतचे अपडेट्सही तो आवर्जून चाहत्यांशी शेअर करत असतो. आताही त्याने पोस्ट केलेला व्हीडिओ चाहत्यांनी उचलून धरला आहे. करणच्या आगामी ब्रम्हास्त्र सिनेमाबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आलिया भट आणि रणबीर कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा बॉलिवुडमधला आजवरचा सर्वात महागडा सिनेमा असल्याचे बोलले जाते आहे. अयान मुखर्जी यांनी सिनेमाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.

या सिनेमात ५ हजार वर्षे जुन्या अस्त्राच्या मदतीने रणबीर कपूर जगाला वाचवतो. सिनेमाचं पहिल्या भागाचं शूटिंग पूर्ण झाल्याचा उत्स्फूर्त आनंद व्यक्त करणाऱ्या पोस्ट आलिया भटने विविध सोशल मीडियावर टाकल्या. करणनेही हा सिनेमा येत्या ९ सप्टेंबरला रिलीज होणार असल्याचं जाहीर करत एक लक्षवेधी व्हीडिओ 'कू' ॲपवर शेअर केला आहे. तीन वेगवेगळ्या भागांमध्ये रिलीज करण्यात येणाऱ्या या सिनेमात रणबीर कपूर, मौनी रॉय, आलीया भट, अमिताभ बच्चन, नागार्जून आणि शाहरूख खान यांच्याही भूमिका आहेत. सोबतच हा सिनेमा विविध भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. फॉक्स स्टुडिओज आणि धर्मा प्रोडक्शन्स यांची ही संयुक्त निर्मिती असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Grand Tour 2026 : आंतरराष्ट्रीय दर्जाच्या रस्त्यांचे जाळे; ९०० कोटींचा खर्च अपेक्षित

Pali News : रायगड जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत मोठा बदल! 'या' तारखेपर्यंत दुपारऐवजी भरणार सकाळी शाळा

Vidhan parishad Exit Poll 2026: विधान परिषद निवडणूक! महायुतीची एकतर्फी सरशी? 12 पैकी किती जागा जिंकणार?

Crime: क्रूरतेचा कळस! घराबाहेर पडताच टोळक्यानं गाठलं; आधी महिलेवर सामुहिक अत्याचार, नंतर गुप्तांगामध्ये काठी, काडतूस टाकलं अन्...

Pune Fraud News : पर्यटन व्यावसायिकाकडून महिलेची दोन लाखांची फसवणूक; टूरला येणाऱ्या सदस्याचा मृत्यू झाल्याचे सांगत सहल केली रद्द

SCROLL FOR NEXT