kangana ranaut
kangana ranaut 
मनोरंजन

बॉलिवूडची 'क्वीन' आई-वडिलांना होती नकोशी

स्वाती वेमूल

बॉलिवूडमध्ये 'गॉडफादर' असल्याशिवाय आपली वेगळी ओळख निर्माण करणं कठीण आहे असं म्हटलं जातं. इतकंच नव्हे तर पुरुषप्रधान म्हणून ही फिल्म इंडस्ट्री ओळखली जाते. अशात कोणाचाही वरदहस्त नसताना अभिनेत्री कंगना राणावत बॉलिवूडची 'क्वीन' ठरली. कंगनाला सुरुवातीला अपयश सहन करावं लागलं. मात्र चाचपडत का होईना, तिने तिचं दमदार अभिनय कौशल्य प्रेक्षकांसमोर सादर केलं आणि आज ती स्वत:च्याच बळावर चित्रपटांची निर्मितीसुद्धा करते. सोशल मीडियावर कंगनाने मांडलेली मतं अनेकांना पटत नसली तरी एक अभिनेत्री म्हणून तिच्या अभियन कौशल्याचा चाहतावर्ग मोठा आहे. आतापर्यंत तिला चार राष्ट्रीय पुरस्कार आणि चार फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरविण्यात आलं आहे. 

२३ मार्च १९८७ रोजी हिमाचल प्रदेशातील भमला इथं कंगनाचा जन्म झाला. आधी ती डॉक्टर होण्याची स्वप्नं पाहत होती. पण तिच्या नशिबात मात्र वेगळंच लिहिलेलं होतं. आज बॉलिवूडमध्ये ती आघाडीची अभिनेत्री असली तरी हीच कंगना एकेकाळी तिच्या आईवडिलांना नकोशी होती. एका मुलाखतीत कंगनाने याबद्दलचा खुलासा केला होता. कंगनाच्या आधी तिच्या भावाचा जन्म झाला होता. मात्र जन्माच्या अवघ्या दहा दिवसांतच त्याला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे कंगनाच्या जन्माच्या वेळी आईवडिलांनी मुलाची अपेक्षा ठेवली होती.  

कंगनाने मॉडेलिंगपासून तिच्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गँगस्टर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर तिने 'वो लम्हें', 'लाइफ इन अ मेट्रो', 'फॅशन', 'राज', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'क्वीन', 'तनु वेड्स मनु' यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने तिच्या अभिनयाची छाप सोडली. आता बी-टाऊनमध्ये कंगना आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तिने स्वत:ची 'मणिकर्णिका फिल्म्स' ही निर्मिती कंपनीसुद्धा स्थापिक केली. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Janhvi Kapoor: मराठी कलाकारांच्या मुस्काडात... गांधी-आंबेडकरांवरील जान्हवीच्या 'त्या' विधानानंतर किरण मानेंची पोस्ट व्हायरल

Loksabha Election 2024 : राजधानीत मोदी विरुद्ध केजरीवाल लढत; दिल्लीत आज मतदान

Bankura Loksabha Election : कम्युनिस्टांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा प्रभाव

Sharad Pawar : दुष्काळाबाबत सरकार गंभीर नाही

SSC HSC : दहावी-बारावीची ग्रेड पद्धत होणार बंद

SCROLL FOR NEXT