Rakhi Sawant esakal
मनोरंजन

Rakhi Sawant: ‘तुला लाज कशी वाटत नाही’,राखी सावंतचे शर्लिन चोप्रावर गंभीर आरोप...

सकाळ डिजिटल टीम

साजिद खानने टीव्हीवरील सर्वात वादग्रस्त आणि तितकाच लोकप्रिय शो बिग बॉसमध्ये एंन्ट्रि केली अन् त्याच्यावर वादाचे ढगचं दाटले. MeToo मोहिमेदरम्यान त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले.दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून साजिद खानला शोमधून काढून टाकण्याची मागणी केली होती.

इतकचं नव्हे तर  शर्लिन चोप्रानेही साजिद खानवर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.त्याची जोरदार चर्चाही झाली आहे.अलीकडेच शर्लिनने साजिद खान विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती आणि त्याला लवकरात लवकर बिग बॉसमधून बाहेर काढण्याची मागणी केली होती. शर्लिन चोप्राने मीडियासमोर सलमान खान साजिदवर कारवाई न करत नाही असा आरोपही केला होता.तिनेही पत्रकारांशी बोलतांना जोरदार ड्रामाबाजी केली. ती कॅमेऱ्यासमोर रडलीही होती.

 या सर्व प्रकारानंतर आता ड्रामा क्वीन राखी सावंतने शर्लिन चोप्रावरच उलट गंभीर आरोप केले. तिने शर्लिन चोप्राची खिल्ली उडवली आहे. एका व्हिडिओमध्ये राखी शर्लिनने साजिदवर केलेल्या आरोपांबद्दल बोलताना दिसत आहे. तो शर्लिनची नक्कल करून तिची छेड काढत आहे आणि म्हणाली, ‘का केस होइल,जेव्हा त्याची चूक नाही. त्याच्याविरुद्ध कोणीही साक्ष दिली नाही, न्यायालयाने साजिद खानला सजा-ए-फसी किंवा काला पाणीचीही शिक्षा केली नाही. तू साडी नेसून 4 किलोचा मेकअप करुन, मीडियासमोर येवून आरोप करशील. तुला स्वतःची लाज वाटत नाही का? तु वाटीभर पाण्यात जीव का देत नाही.याशिवाय मीडियासमोर कोणावरही आरोप करण्यापूर्वी विचार करायला हवा, असे राखीने म्हटले आहे.

आपला मुद्दा ठेवत राखी म्हणाली – पोलिसांनाही कळले की या प्रकरणात कोणतीही सत्यता नाही. या मॅडम रोज उठून तक्रार करतात. कधी माझा भाऊ राज कुंद्रासाठी, कधी माझा भाऊ साजिद खानसाठी. तिला काय समस्या आहे? आता 6 महिने थांबा, ती आणखी एक बलात्काराची केस आणेल. राखी पुढे म्हणाली की, आधी स्वतःला सुधारा आणि मग इतरांना सुधारा’

आता राखी सावंतचा हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स राखीवरच चांगलेच संतापले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा राखी स्वतः असा ड्रामा करते, तेव्हा ती याचा विचार का करत नाही. याशिवाय साजिद खानला सपोर्ट केल्यामुळे लोक तिला खोटी असल्याचं बोलत आहे. सांगत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EPF Rule: नोकरी बदलली तर 5 वर्षांचा PF नियम तुटतो का? NCP Days म्हणजे काय? पेन्शन-टॅक्सवर काय परिणाम

Summer Heatwave : उन्हाच्या तडाख्याने कळपावर संकट; २८ मेंढ्यांचा मृत्यू, ७० मेंढ्यांवर उपचार सुरू

Mumbai Goa Highway Update : गडकरी म्हणाले महिनाभर, पण वास्तव काही वेगळंच! मुंबई-गोवा महामार्गाची पाहा सविस्तर 'डेडलाईन'; पावसाळ्यापूर्वी रस्ता होणार का चकाचक?

Electricity Bill Saving Tips : सरकारने स्वतःच सांगितली लाईट बिल कमी करण्याची पद्धत; मीटर पळेल एकदम हळू, पाहा सोपी ट्रिक

Latest Marathi News Live Update: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात, अनेकांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT