Bollywood: Ranbir Kapoor tension for daughter raha,says... Google
मनोरंजन

Bollywood: मुलीविषयी रणबीरच्या मनात असुरक्षिततेची भावना; म्हणाला,'माझी मुलगी जेव्हा 20 वर्षांची होईल..'

सौदी अरेबियात एका फिल्म फेस्टिव्हलला रणबीर कपूर गेला असताना त्यानं पहिल्यांदाच सर्वांसमोर मुलगी राहाविषयी आणि तिच्या संगोपनाविषयी भाष्य केलं आहे.

प्रणाली मोरे

Bollywood: नोव्हेंबर २०२२ मध्ये आलिया भट्ट आणि रणबीर कपूरनं एका गोड मुलीला जन्म दिला. बॉलीवूड कपलसाठी ही आयुष्यातील सगळ्यात खास गोष्ट आहे. याचवर्षी दोघांनी लग्न केलं आणि लग्नाला एक वर्ष होण्याआधीच त्यांच्या घरी लहान परीनं जन्म घेतला. पहिल्यांदाच रणबीर कपूरनं आपली मुलगी राहाविषयी प्रतिक्रिया दिली आहे.

काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूरनं सौदी अरेबियात आयोजित केलेल्या रेड सी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये भाग घेतला होता. यादरम्यान ४० वर्षीय अभिनेत्यानं आपल्या मनातील मोठी असुरक्षित भावना सर्वांसमोर बोलून दाखवली आहे. जेव्हा त्याला विचारलं गेलं होतं की वडील झाल्यानंतर आयुष्यात काय बदल झाला,तेव्हा त्यानं त्यावर मोकळेपणानं भाष्य केलं आहे.(Bollywood: Ranbir Kapoor tension for daughter raha,says...)

रणबीर कपूर म्हणाला की,''मी लग्न करायला इतका उशीर केला याची मला खंत आहे. माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी असुरक्षिततेची भावना ही आहे की माझी मुलं जेव्हा २० किंवा २१ वर्षांचे असतील तेव्हा मी ६० वर्षांचा असेन. मी त्यावेळी त्यांच्यासोबत फूटबॉल खेळू शकतो का? मी त्यांच्यासोबत तितक्या जोशात पळण्याचा आनंद घेऊ शकेन का?''

हेही वाचा: Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी

मुलीच्या संगोपनावर देखील रणबीरनं या मुलाखतीत संवाद साधला. मुलीसाठी आपण वेळ कसा काढतो यावर देखील तो बोलला. आलिया आणि रणबीर मिळून शूट आणि इतर कामं प्लॅन करत आहेत,जेणेकरून ते मुलगी राहाला वेळ देऊ शकतील. याविषयी बोलताना रणबीर म्हणाला की, ''मी खूप जास्त काम नाही करत. जास्तीत जास्त मी १८० ते २०० दिवस काम करतो. पण आलिया खूप काम करते,ती बिझी असते. आम्ही दोघं मिळून आता सगळं बॅलेन्स करण्याचा प्रयत्न करतो आहोत''.

रणबीर कपूरने हे देखील सांगितले का आलिया आणि मी सिनेमांना नीट मॅनेज करणार आहोत. कदाचित जेव्हा आलिया कामावर जाईल तेव्हा मी कामातून ब्रेक घेईन. हे अगदी तसंच असेल जेव्हा मी कामावर जाईन तेव्हा ती आमच्या मुलीची काळजी घेईल,तिच्याजवळ असेल.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरला ६ नोव्हेंबर,२०२२ रोजी कन्यारत्नाचा लाभ झाला. मुलीचं नाव आजी नीतू कपूरनेच 'राहा' ठेवलं याचवर्षी आलिया आणि रणबीरनं मुंबईत लग्न केलं होतं. हे वर्ष दोघांसाठी खास राहिलं. आलिया 'गंगूबाई काठियावाडी','आरआरआर','बह्मास्त्र' सारख्या सिनेमातून आपल्याला दिसली तर त्याचवेळी रणबीर 'शमशेरा','ब्रह्मास्त्र' मधनं नजरेस पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT