ranu mandal 
मनोरंजन

रातोरात स्टार झालेल्या रानू मंडलची हालत खराब, कोरोनामुळे मिळत नाहीये काम

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- पश्चिम बंगला येथील राणाघाट स्टेशनवर लता मंगेशकर यांचं गाणं गाऊन रानू मंडल एका रात्रीत स्टार बनली होती. प्रसिद्धी झोतात आल्यानंतर रानू मंडल यांचं आयुष्य पहिल्यासारखं राहिलं नाही. तिने जे काही केलं, जो काही पेहराव केला त्या सगळ्याची चर्चा झाली. कोलकातामध्ये मागच्या वर्षी नवरात्रीत असं कुठलंच पुजा मंडप नसेल जिथे त्यांनी गायलेलं 'तेरी मेरी कहानी' हे गाणं वाजलं नाही. या दरम्यान त्या सोशल मिडिया सेसेंशन देखील बनल्या. सगळीकडे तिचीच चर्चा आणि लोकप्रियता दिसून येत होती.

मात्र आता असं दिसून येतंय की तिच्या आवाजाची जादू गायब झालीये नोव्हेंबर २०१९ मध्ये रानू मंडलने हिमेश रेशमियासोबत तीन गाणी रेकॉर्ड केली होती. मात्र येत्या काही दिवसात त्यांच्या कामाबद्दल कसलीच चर्चा झाली नाही. त्यातंच आता अशी माहिती मिळतेय की तिच्या आयुष्यात पुन्हा आधीसारखेच दिवस आले आहेत. कोरोना व्हायरसमुळे बेरोजगारी वाढत आहे. याचाच फटका अनेकांच्या करिअरवरही झालाय. कोरोना व्हायरसच्या संकटामुळे रानू मंडल यांची हालत देखील खराब झालीये.

सध्या त्यांना मुंबईत काहीच काम मिळत नसल्याचं कळतंय ज्यामुळे त्या खुप हैराण आहेत. एकानंतर एक वादाच्या भोव-यात अडकलेल्या राणाघाटच्या लता आता नवीन संधीच्या शोधात आहेत. प्रसिद्धी मिळाल्यानंतर रानू मंडल यांनी त्यांचं जुनं घर सोडलं होतं आणि नवीन घरात शिफ्ट झाल्या होत्या. मात्र आता अशीही माहिती मिळतेय की त्यांनी त्यांचं नव घर सोडलं असून त्या पुन्हा त्यांच्या जुन्या घरी परतल्या आहेत. रानू मंडल यांच्याकडे आता जास्त काम नाहीये त्यामुळे त्यांची आर्थिर परिस्थिती ढासळली आहे आणि त्यामुळेच त्या त्यांच्या जुन्या घरी परतल्याचं कळतंय.    

bollywood the rise and fall of ranu mondal the overnight internet star not getting work due to coronavirus  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: जरांगे पाटील मुंबई दौऱ्यावर ठाम! मधले मुक्काम रद्द, थेट आझाद मैदान गाठणार; सोबतच्यांना माघारी जाण्याचं आवाहन

Palghar News : रुग्णालय राडा प्रकरणात कुंदन संखेसह 22 जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी; राहुल घरत न्यायालयीन कोठडीत

Marathi News Live Updates : संतोष पंडित यांना जामीन मंजूर

Endometriosis & Insulin Resistance: एंडोमेट्रिओसिसचा फक्त गर्भाशयावर नाही, ब्लड शुगरवरही परिणाम होतो? नेमकं कारण काय; जाणून घ्या

UPI MDR Fee: 'यूपीआय'वरील शुल्कावरुन होणाऱ्या आरोपांना सरकारचं स्पष्टीकरण; 95 टक्के व्यवहार मोफतच...

SCROLL FOR NEXT