Zeenat Aman birthday Esakal
मनोरंजन

Zeenat Aman birthday: कधी बरगड्या तोडल्या तर कधी रक्तबंबाळ होई पर्यंत मारलं; अशी होती झीनत अन् संजयची लव्हस्टोरी...

सकाळ डिजिटल टीम

Zeenat Aman birthday: सत्तरचं दशक गाजवणारी बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री झीनत अमान ही हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात सुंदर अभिनेत्री होती. त्या काळात तिने बोल्डनेसची हद्द पार केली होती. इंडस्ट्रीला पार वेड लावलं होते. तिची लोकप्रियता अफाट होती.

इंडस्ट्रीतील मोठंमोठे कलाकार तिच्यामागे वेडे होते. पण झीनत ही विवाहित आणि तीन मुलांचे  वडील असलेल्या संजय खान यांच्या प्रेमात पडली. काही वेळातच दोघांमध्ये खडाजंगी झाली. प्रकरण इतकं वाढलं होतं की एकदा संजय खानने झीनतला खूप मारले होते.

झीनत अमान आणि संजय खान 'अब्दुल्ला' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान एकमेकांच्या प्रेमात पडले होते. झीनतच्या चाहत्यांना जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा त्यांचे हृदय तुटले होते. तिचे चाहते तिच्यावर नाराज होते. मात्र हे दोघे कधीच एकत्र आनंदी राहू शकले नाही.

दोघांमध्ये लवकरच मतभेद झाले. त्यांचे मतभेद कधी भांडणात रूपांतरीत झाले ते कोणालाच कळले नाही. संजय खानने एकदा नाही तर अनेक वेळा झीनतला मारहाण केली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संजय खान जेव्हा-जेव्हा झीनतला सर्वांसमोर मारहाण करायचा त्यावेळी कूणीही झीनतला वाचवण्यासाठी पुढे येत नसत.

असं सांगण्यात येत की झीनत अमान लोणावळ्यात शूटिंग करत असतांना संजय खानने झीनतला फोन केला आणि अब्दुल्ला चित्रपटातील गाणे पुन्हा शूट करायचे आहे असं सांगितलं. या गाण्याचे शूटिंग आधीच झाले होते त्यामूळे झीनतने संजयला सांगतेले की ती दुसऱ्या चित्रपटाच्या तयारीत व्यस्त असल्याने तिच्याकडे वेळ नाही.

हे ऐकून संजय खान खूपच संतापला होता. संजय खानला राग आल्याचं पाहून झीनत अमान त्याला भेटण्यासाठी निघाली. झीनत अमान हॉटेलमध्ये जाताच संजय खानने तिला खोलीत नेत बेदम मारहाण केली. झीनत अमानच्या किंचाळ्या ऐकून संजय खानची पत्नी त्या खोलीत आली आणि झीनतला वाचवण्याऐवजी संजयलाच भडकवू लागली.

हेही वाचा: महापाषाणयुगीन दगडी स्मारकामध्ये दडल्या आहे समृद्ध संस्कृतीच्या खुणा....

त्यावेळी त्या हॉटेलमध्ये अनेक लोक उपस्थित होते. अनेकांना झीनतच्या किंचाळ्या ऐकू येत असतानाही कोणीही झीनतला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर हॉटेलमधील काही व्यवस्थापक झीनतकडे गेले तेव्हा त्यांना झीनतच्या डोळ्यातून रक्त येत असल्याचे दिसले. या घटनेनंतर झीनतवर जवळपास आठ दिवस उपचार सुरू होते.

 त्यावेळी संजय खानने झीनतला एवढी मारहाण केली होती की ती पूर्णपणे रक्तबंबाळ झाली होती. बराच काळ उपचार घेतल्यानंतरही तिला बेड रेस्टवरच राहावे लागले. या सर्व प्रकारानंतरही झीनत अमानने संजय खानविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली नाही.  

त्यादरम्यानचं तिच्या डॉक्टरांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, "संजय खानने झीनतला मारण्याची ही पहिलीच वेळ नव्हती, याआधीही संजय खानने झीनतला इतक्या जोरात लाथ मारली होती की तिच्या बरगड्याचं तुटल्या होत्या आणि तिचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT