Jhoome Jo Pathaan Esakal
मनोरंजन

Jhoome Jo Pathaan: बेशरम रंगच्या वादात..झूमे जो पठाणची जबरदस्त एंट्री

सकाळ डिजिटल टीम

Shahrukh Khan Deepika Padukone movie new song Jhoome Jo Pathaan: सध्या शाहरुख खानचा आगामी पठाण चित्रपटातील 'बेशरम रंग' गाण्यावरून देशभरात वादाला तोंड फुटले आहे. बेशरम रंग हे गाणे काही दिवसांपूर्वी रिलीज झाले असून या गाण्यात दीपिकाने घातलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे खळबळ उडाली आहे कारण अभिनेत्रीच्या भगव्या रंगामूळे हिंदू लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत असं बोललं जात आहे.

दरम्यान, आता निर्मात्यांनी चित्रपटातील 'झूमे जो पठाण' हे नवीन गाणं रिलीज केलं आहे. या गाण्यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणची जबरदस्त केमेस्ट्री दिसत आहे.

झूम जो पठाण हे गाणं आज रिलिज करण्यात आलं आहे. हे गाणं अरिजित सिंगने त्याच्या सुरेल आवाजात गायलं आहे. जे ऐकल्यानंतर शाहरुख अन् दिपिकीचे चाहतेही आंनदीत दिसताय. हे गाणं ऐकल्यानंतर त्याचे बोलं लगेच तुमच्या ओठावर आल्याशिवाय राहणार नाही.

'झूमे जो पठाण' हे गाणं रिलिज होताच व्हायरल झालं आहे. ते गाणे व्हायरल होताच शाहरुखच्या चाहत्यांनी त्याच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. दीपिका घायाळ करणार बोल्ड अंदाज आणि शाहरुखचा लूक पाहिल्यानंतर चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडतो आहे. दीपिकानं चाहत्यांना घायाळ करुन टाकले आहे.

अवघ्या काही तासांत लाखो लाईक्स, व्ह्युज त्या व्हिडिओला मिळाल्याचे दिसून आले आहे. गेल्या बऱ्याच दिवसांपासून शाहरुख आणि दीपिकाच्या बेशरम रंग' गाण्यावर बराच वाद झाल्याने आता यागाण्यावर नेटकऱ्यांच्या काय प्रतिक्रिया असतील याकडेही लक्ष लागले आहे. मात्र ह्या गाण्याची चर्चा होणार हे नक्की.

अरिजित सिंगचा आवाजाने पुन्हा एकदा त्याची जादू दाखवली आहे. गाणं काही क्षणातच तुम्हाला मंत्रमूग्ध करेलं यात काही शंकाच नाही. याआधीही अरिजितने शाहरुख खानसाठी गाणी गायली आहेत. 'दिलवाले' चित्रपटातील 'गेरुआ' आणि 'जब हॅरी मेट सेजल'मधील 'हवाएं' या गाण्याला त्याने आपला आवाज दिला. ही दोन्ही गाणी हिट ठरली. अशा परिस्थितीत झूम जो पठाण निर्मात्यांना हिट ठरेल अशी अपेक्षा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs NZ:'गौतम गंभीरने ठरवलं तर तो स्वतः बॅटिंगला येईल; कठीण निर्णय मी आणि कोच मिळून...', फायनलपूर्वी सूर्यकुमार स्पष्टच बोलला

Latest Marathi News Live Update: बीकेसीमध्ये विस्तारासाठी एनएसईनंतर आता बीएसईची तयारी

फक्त 8 दिवसांमध्ये पालटणार 3 राशींच्या रखडत्या नशिबाचा खेळ ! शुक्रादित्य राजयोगामुळे पडणार पैशांचा पाऊस

T20 World Cup : यंदाच्या वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक बघितल्या गेलेला सामना कोणता? इंडिया-पाकिस्तान सामना राहिला तिसऱ्या क्रमांकावर...

'पूर्वेश अमर रहे'च्या घोषणांनी नागपूर हेलावले, वायुसेनेच्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

SCROLL FOR NEXT