Arijit Singh Esakal
मनोरंजन

Arijit Singh: अरिजीत सिंहचं गाण ऐकायला १६ लाख रुपये? काय आहे प्रकरण...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याचे देशभरात नव्हे तर भारताबाहेरही त्याचा चाहता वर्गही तगडा आहे. त्याने गायलेली गाणे काही क्षणातच व्हायरल होतात. त्याच्या आवाजाचे लोक चाहते आहेत. त्याच्या गाण्याचे ऑडिओ ऐकल्यानंतर चाहते भारावतात. त्यातच अरिजीतला  लाइव्ह ऐकण्याची संधी तर प्रेक्षक सोडतच नाही. त्यामूळे त्याच्या लाइव्ह कॉन्सर्टला तुफान गर्दी असते.

दरम्यान मीडिया रिपोर्टनुसार अरिजीत सिंहचा याचा काही दिवसात भारतातील विविध महत्त्वाच्या शहरात कॉन्सर्ट होणार आहे. एकीकडे चाहते त्याच्या कॉन्सर्टसाठी उत्सुक तर आहेत तर दुसरीकडे सोशल मीडियावर या कॉन्सर्टबाबत काही  स्क्रिनशॉट व्हायरल होत आहे. यात अरिजीतच्या कॉन्सर्टच्या तिकीटाचे काही फोटो असल्याचा दावा करण्यात येत आहे. या तिकीटाचे दर पाहिल्यानंतर त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.

अर्ली बर्ड सेक्शन, स्टँडिंग एरियामध्ये किमती 999 रुपयांपासून सुरू होत आहे त्यातच, रिंगणातील प्रीमियम लाउंजच्या किमती तब्बल 16 लाख रुपयांपर्यंत जातात. तिकीट-बुकिंग साइटनुसार, प्रीमियम लाउंज 1 जे 16 लाख रुपयांमध्ये बुक केले जाऊ शकते, त्यात 40 खुर्च्या बसू शकतात. जेवण आणि मद्याची ही सोय असणार आहे. प्रीमियम लाउंज मध्ये 2, 3 आणि 4 च्या किंमत 10, 12, 14, लाख आहे आणि त्यात 40, 30 आणि 30 सीट बसू शकतात.

 गायकाचे चाहते निराश झाले आहेत. एका चाहत्याने ट्विटमध्ये लिहिले, “मला अरिजित सिंग आवडतो पण मी इतका खर्च करणार नाही. आता या फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहते नाराज झाले आहेत. एका युजरने हा स्क्रिनशॉट शेअर करत म्हटले आहे की 'मला अरिजीतची गाणी आवडतात पण एवढे पैसे खर्च करणार नाही'.

तर दुसऱ्याने कमेंट केलीय की, '१६ लाखात त्याने स्वत: घरी येऊन आम्हाला गाणं ऐकवलं पाहिजे.'त्यामुळे एकाने अशी कमेंट केली आहे, 'रडण्यासाठी १६ लाख कुणी खर्च करू नये.' एकानं म्हटंलय  की, '१६ लाखात अरिजीतच्या शेजारी घर घेऊ, रोज त्याला ऐकता येईल'. व्हायरल होणाऱ्या या स्क्रिनशॉटवर अनेक गमतीदार प्रतिक्रिया येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT