Raksha Bandhan 2023: Esakal
मनोरंजन

Raksha Bandhan 2023: कोणी डॉक्टर तर कोणी आर्मीत! बॉलिवूड स्टार्सची ही भावंडं कॅमेऱ्यापासून लाबंच!

Vaishali Patil

भाऊ आणि बहिणीमधील सुंदर बंधाचा उत्सव म्हणजे रक्षाबंधन. हा सण सर्वच मोठ्या उत्साहात साजरा करतात. भाऊ आणि बहिणी या दिवसाची आतुरतेने वाट पाहतात. बॉलिवूडमध्येही रक्षाबंधनाचा सण नेहमी साजरा करताना आपण पाहिलं आहे.

बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. त्यात 'जोश'मधील शाहरुख खान-ऐश्वर्या राय, 'दिल धडकने दो'मध्ये रणवीर सिंग प्रियंका चोप्रा.

अशा जोड्या आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. बॉलिवूडमध्ये बऱ्याच कलाकारांचे भावंड हे एकाच क्षेत्रात आहे. मात्र असेही काही भावंड आहेत ज्यांचा बॉलिवूड आणि लाईमलाईटशी काहीही संबध नाही.

करिष्मा-करिना, सलमान- अरबाज असे अनेक जोड्या आहेत मात्र शाहरुखची बहिण , दीपीकाची बहिण असे काही भावंडं हे मीडियापासून दूर आहेत. त्याचा बॉलिवूडसोबत काहीही संबंध नाही. तर आज रक्षाबंधन निमित्त अशाच काही जोड्या आपण पाहणार आहोत, जे चर्चेत नसतात.

शाहरुख खान आणि शहनाज लालरुख खान

बॉलिवूडचा बादशाह किंग खान याला देखील एक बहिण आहे. शाहरुख खानच्या बहिणीबद्दल फार कमी लोकांनाच माहीत असेल. ती शाहरुखची मोठी आहे. त्याच्या बहिणीचे नाव शहनाज खान आहे. ती क्वचितच मीडियासमोर येते.

ती वयाने शाहरुखपेक्षा मोठी आहे. 1960 आई-वडिलांच्या निधनानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली. त्यानंतर शाहरुखने तिची जबाबदारी उचलली आता शहनाज शाहरुखसोबत त्यांच्या मुंबईच्या मन्नतमध्येच राहते.

दीपिका पदुकोण आणि अनिशा पदुकोण

दीपिका पदुकोण ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. अनिशा ही तिची धाकटी बहीण आहे. दोघांमध्येही खुप चांगला बॉण्ड आहे. अनिशा ही व्यावसायिक गोल्फपटू आहे. ती लाईम लाईटपासून दूर असते. काही फॅमिलीच्या कार्यक्रमातच ती दीपिकासोबत दिसते. तेव्हा तिची चर्चा होते.

बिपाशा बासू आणि विजेता बासू

विजेता ही बिपाशा बासूची धाकटी बहीण आहे. ती बिपाशाची खुप लाडकी आहे. बिपाशाने अनेकदा सांगितलं आहे की, विजेताला बिपाशा तिची लहान मुलगीच मानते. तिचे खुप लाड करते. बहिणीप्रमाणे तिलाही फिल्म इंडस्ट्रीत येण्याची इच्छा होती मात्र आतापर्यंत तिला त्यात फारसे यश मिळाले नाही.

सैफ अली खान आणि सबा अली खान

सबा ही सैफ अली खानची मोठी बहीण आहे. सबा ही लाइमलाइटपासून दूरच असते. ती काही फॅमिली फोटोंमध्ये त्याच्या सोबत दिसते. सैफची फॅमिली ही बॉलिवूडशी संबंधित असली तरी सबा कधीही लाईमलाईटमध्ये राहिली नाही.

दिशा पटानी- खुशबू पटानी

अभिनेत्री दिशा पटनीच्या मोठ्या बहिणीचे नाव खुशबू आहे. ती दिशाची मोठी बहीण आहे आणि सैन्यात लेफ्टनंट आहे. खुशबू ही सोशल मीडिया आणि लाइमलाइटपासून दूर राहते. दिशा पटनी अनेकदा तिच्या बहिणीचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते.

रणवीर सिंग आणि रितिका भवनानी

रणवीर सिंग हा बॉलिवूडमधला लोकप्रिय अभिनेता आहे.त्याला एक मोठी बहीण आहे जिचे नाव रितिका आहे. रितिका ही त्याची आईप्रमाणे काळजी घेते. ती नेहमी रणवीरच्या मदतीसाठी तयार असते. ती रणवीर आयुष्यात असल्याने ते स्वत:ला खुप भाग्यवान समजतो.

कार्तिक आर्यन आणि कृतिका तिवारी

कार्तिक आर्यनची मोठी बहीण कृतिका तिवारी ही देखील लाईमलाईटपासून दुरच असते. कार्तिक अनेकदा तिच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेयर करत असतो. ती डॉक्टर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wakad Hinjewadi News : वाकड, हिंजवडीत अनधिकृत पार्किंगमुळे कोंडी; वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष; नागरिकांकडून कारवाईची मागणी!

Mutual Fund : काय आहे Active आणि Passive म्युच्युअल फंड? जाणून घ्या म्युच्युअल फंडमधील रिस्क आणि रिटर्न!

IND vs SA: शुभमन गिल टीम इंडियासोबत दुसऱ्या कसोटीसाठी प्रवास करणार की नाही? अखेर BCCI नेच दिले अपडेट

Viral News : ऑफिसमध्ये मॅनेजर बनायचा हिटलर! सुट्टी-वर्क फ्रॉम होमवर विचारायचा शंभर प्रश्न; वैतागून तरुणाने केला धक्कादायक प्रकार

Latest Marathi Breaking News Live Update : 26 तारखेच्या बैठकीत युवा स्वाभिमान पार्टीची भूमिका स्पष्ट करू - नवनीत राणा

SCROLL FOR NEXT