bollywood Uorfi Javed Demon look demon urfi javed new video viral on social media  Esakal
मनोरंजन

Urfi Javed : "अप्सरा आली...", उर्फीला पाहून नेटकऱ्यांनी हनुमान चालीसा का म्हटली?

Vaishali Patil

Uorfi Javed Demon Look: उर्फी जावेदने अन् तिची फॅशन हे समीकरण सर्वांना माहीतच आहे. ती अशी काही फॅशन करते जी नेटकऱ्यांच्या विचारा पलिकडे असते. मनोरंजन विश्वात उर्फीची वेगळीच ओळख आहे. अनेक कारणांसाठी ती चर्चेत राहते. तिची फॅशनच तिला लाईमलाईटचा भाग बनवते. बऱ्याचदा अतरंगी फॅशनमुळे असणाऱ्या उर्फीनं तर आता कहरच केला आहे. आता तिच्या अलीकडच्या लूकने तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे.

उर्फी जावेदने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती एका काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे. ज्यात तिचा ड्रेस, सोन्याचे दागिने, ब्लॅक लिप लाइनर आणि हॉरर मेकअप तिने केला आहे. यात उर्फी एका सैतानसारखी दिसते.

हा व्हिडिओ पोस्ट करत उर्फीने लिहिले - 'माझ्या आत असलेल्या सैतानला बाहेर काढण्याची कल्पना.'

यात उर्फी सर्वात भयानक आणि वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. तिने ब्रॅलेटशिवाय ब्लेझर आणि पँट घातली आहे. उर्फीने सोन्याच्या दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला तर तिच्या हेअरस्टाईलनं सर्वांचे लक्ष वेधले आहे. उर्फीचा हा लूक पाहून चाहतेही हैराण झाले आहेत. या व्हिडिओला उर्फीनं अप्सरा आली हे गाणं लावलं आहे.

तर दुसरीकडे तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. एकानं लिहिलयं की, 'तू खुप वाईट चेटकिण दिसत आहे'. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, 'हे पाहिल्यानंतर माझा अप्सरावर विश्वास उडाला आहे.' तर काहीजण व्हिडिओच्या कमेंटमध्ये हनुमान चालिसाचे पठण करतानाही दिसले. एकाने लिहिले की, 'आता मी रात्री झोपू शकणार नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest: सोशल मीडियावरील बंदीवरून नेपाळ ढवळून निघाला; भारताने नागरिकांना सतर्कतेचा सल्ला दिला, सांगितलं...

महाराष्ट्राच्या Shivam Lohakare ने मोडला 'गोल्डन बॉय' नीरज चोप्राचा विक्रम; पण, होणार नाही अधिकृत नोंद, कारण...

Pune News : विसर्जन मिरवणुकीत हायटेक पोलिसिंग; चेहरा ओळख तंत्रज्ञानाचा अचूक वापर; सराईत गुन्हेगारांवर चाप

Shivaji Maharaj: इतिहासातील गुपित! छत्रपती शिवाजी महाराजांनी बोटं छाटल्यानंतर शाहिस्तेखान कुठं पळाला? पुढं कधीच परतला नाही

Thane Crime: सोनसाखळी चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड, तीन सराईत गुंडांना अटक

SCROLL FOR NEXT