Javed Akhtar  Team esakal
मनोरंजन

हाय प्रोफाईल असण्याची किंमत बॉलीवूड चुकवतोय- जावेद अख्तर

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : हाय प्रोफाईल (High profile) असण्याची किंमत बॉलीवूड (bollywood) चुकवत असल्याचं विधान प्रसिध्द कवी,लेखक जावेद अख्तर (javed Akhtar) यांनी केले आहे. अब्जावधी रुपये किमतीचे कोकेन सापडल्याची हेडलाईन होत नाही. मात्र काही लाख रुपयाच्या गांजा सापडल्याचा गवगवा सर्वत्र सुरु असल्याची टिका अख्तर (Drug statement) यांनी केली. क्रूजवरील पार्टीत ड्रग्ज (cruise drug party) घेतल्या प्रकरणी सुपरस्टार शाहरुख खान (shahrukh khan) यांचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला अटक झाली, या पार्श्वभूमीवर अख्तर यांनी हे विधान केले आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.

आर्यन खानचे नाव न घेता जावेद अख्तर यांनी गुजरातमधील मुंद्रा बंदरात जप्त केलेल्या 1 अब्ज डॉलर किमतीच्या कोकेनकडे लक्ष्य वेधलं, एवढ्या मोठ्या घटनेची हेडलाईन मला कुठे दिसली नाही. मात्र काही लाख रुपये किमतीच्या गांजाची बातमी मात्र सर्वत्र रंगली आहे, असही अख्तर म्हणाले. सध्याच्या कारवाया बघता बॉलीवूडला लक्ष्य केलं जात आहे का? या प्रश्नावर ते म्हणाले की शेवटी लोक हाय-प्रोफाईल व्यक्तींना टार्गेट करतात, त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न होतो, विनोद केले जातात. सामान्य माणसावर दगड फेकण्याचा वेळ कुणाकडे असतो का ? असा सवालही अख्तर यांनी उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dream11 ची माघार, मग टीम इंडियाचा स्पॉन्सर कोण? Toyota सह तगडी कंपनी शर्यतीत; आशिया चषकापूर्वी BCCI ला लागणार लॉटरी?

Latest Marathi News Updates: गोरक्षका विरुद्ध कारवाई करण्यासाठी आमदार सदाभाऊ खोत पुण्यातील सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल

गोविंदाच्या पत्नी सुनिताच होतं दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश, कबुली देत म्हणाली...'गोविंदा त्याच्यासारखा दिसायचा म्हणून...'

Adventure ट्रेकिंगसाठी शोधताय खास ठिकाण? अरुणाचल प्रदेशातील 'या' आयो व्हॅली ट्रेकचा अनुभव घ्या!

Hartalika Vrat 2025 Puja Samagri: अखंड सौभाग्यासाठी हरतालिका व्रत; पूजेसाठी लागणारे साहित्य व विधीची संपूर्ण माहिती वाचा एकाच क्लिकवर!

SCROLL FOR NEXT