Urfi Javed banned in dubai not because of her clothes but her surname Instageram
मनोरंजन

Urfi Javed: उर्फीच्या दुबई प्रवेशावर बंदी; अतरंगी कपडे घालते म्हणून नाही तर यामागे भलतंच कारण...

उर्फी जावेदनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत आपण दुबईत प्रवास का करु शकत नाही याचं कारण सांगितलं आहे, पण हे कारण समजल्यावर सगळेच अवाक झाले आहेत.

प्रणाली मोरे

Urfi Javed: आपल्या अतरंगी कपड्यांमुळे आणि बेताल वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री उर्फी जावेद पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. तिनं स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं आहे की ती दुबईला जाऊ शकत नाही. यामागे तिचे अतरंगी कपडे हे कारण नसून तिचं नाव हीच खरी समस्या आहे. अखेर अशी काय समस्या दडलीय उर्फीच्या नावात की ती दुबईचा प्रवास करू शकत नाही,चला जाणून घेऊया. (Urfi Javed banned in dubai not because of her clothes but her surname)

उर्फी जावेदनं स्वतः सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांना याविषयी माहिती दिली आहे. तिनं लिहिलं आहे,''माझं अधिकृत नाव फक्त उर्फी असं आहे. माझं आडनाव नाही आणि त्यामुळे मी दुबईला जाऊ शकत नाही''. उर्फीनं एक व्हिडीओ शेअर केला आहे,ज्यात तिनं लिहिलं आहे की,''युएई मध्ये आडनावाशिवाय आपण प्रवास करू शकत नाही''.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Urfi Javed banned in dubai not because of her clothes but her surname

माहितीसाठी इथे नमूद करतो की दुबईनं आपल्या प्रवेश नियमांसदर्भात काही बदल केले आहेत. यानुसार आडनावाशिवाय फक्त नावावर त्यांच्या देशात प्रवेश करण्याची संमती दिली जाणार नाही. म्हणजे जर तुमच्या नावासोबत आडनाव जोडले नसेल तर तुम्ही दुबईला जाऊ शकत नाही. हा नियम फक्त त्या लोकांसाठी आहे,जे काही कालावधीसाठीच तिथे प्रवास करणार आहेत.

सध्या सोशल मीडियावर 'मेरा दिल ये पुकारे आजा' हे गाणं जोरदार चालतंय. उर्फींनं या गाण्यावर रील बनवला आहे. अर्थात,तिच्या या व्हिडीओवर अनेकांनी नाकं मुरडली आहेत आणि त्यावर आक्षेपही घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, मंदिरासमोर भाविकांना कारने चिरडले

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT