Sunil grover esakal
मनोरंजन

Sunil grover: कपिल शर्माचा शो सोडल्यानंतर सुनील ग्रोवरवर आली रस्त्यावर शेंगदाणे विकण्याची वेळ?

सकाळ डिजिटल टीम

कॉमेडियन सुनील सिंग ग्रोव्हर हा आपल्या मजेदार आणि विनोदी स्वभावामूळे लोकप्रिय आहे. तो नेहमीच सर्वांच मनोरजंन करतो. त्याच्या कपिल शर्माच्या शोमधील दादी तर कधी डॉक्टरचा रोल सर्वांनाच खळखळून हसवतो. एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सुनील ग्रोव्हर रस्त्याच्या कडेला शेंगदाणे भाजताना दिसत आहे. त्यामूळे त्याच्यांवर इतकी वाइट परिस्थीती खरंच आली आहे का? यामागचं सत्य तुम्हाला हे तुम्हाला कळायंला हवं.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सुनील ग्रोव्हरने स्वतः हा व्हिडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ समोर आल्यापासून त्याचे चाहते नाराज झाले आहेत. एवढ्या मोठ्या विनोदवीराला शेंगदाणे विकावे लागले असे काय झाले, असा एकच प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत सुनीलने 'खाओ खाओ खाओ' असं लिहिलंय आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

खरं तर सुनीलने काही रस्त्याच्याकडेला शेंगदाणे विकत बसलेला नाही तर तो फिरत असतांना त्याला हे दुकान दिसलंय. त्याच्या दिलखुलास स्वभावामूळे त्याने इथही या लोकांचही आणि व्हिडिओ शेअर करुन त्याच्या चाहत्यांचही मनोरंजन केलंय.

हेही वाचा: Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

मात्र त्याच्या या व्हिडिओवर त्याच्या चाहत्याच्या भन्नाट प्रतिक्रिया येत आहे. चाहते त्याच्या व्हिडिओंवर कमेंट करत आहेत तसेच विविध प्रकारचे प्रश्न विचारत आहेत. एका चाहत्याने लिहिले, ‘कल्पना करा की तुम्ही शेंगदाणे विकत घ्यायला गेला अन् तुम्हाला तिथं सुनील भेटेले’. तर एकानं म्हटंलय 'सर, पत्ता द्या, आताच येतो.' दुसर्‍या युजरने कमेंट करत लिहिले, 'कसे दिवस आले '. एका युजरने कॉमेडीयनची खिल्ली उडवत ‘द कपिल शर्मा शो सोडल्यानंतर ही वेळ आली’ अशी कमेंट केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

Someshwar Election: सोमेश्वरच्या सत्तासंघर्षात ८४.२५ टक्के मतदान! २३ हजार ३९३ सभासदांचा कौल; ८३ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद, आज निकाल

AI Farming: ‘एआय’तंत्राच्या मदतीने थोपविला दुष्काळ!तटबोरगावच्या शेतकऱ्याने वाचवला १५ एकर ऊस, पाण्याचीही बचत

SCROLL FOR NEXT