मनोरंजन

Vidyut Jammwal Photos: रणवीर सिंगनंतर विद्युत जामवालने शेअर केले न्यूड फोटो! वाढदिवशीच मोठा धमाका

विद्युतचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल

Vaishali Patil

Vidyut Jammwal nude photos: बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल हा आज त्याच्या 43 वा वाढदिवस साजरा करत आहे. 'बुलेट राजा', 'कमांडो', 'कमांडो 2' आणि 'कमांडो 3' यांसारख्या चित्रपटांमध्ये आपल्या जबरदस्त अॅक्शन आणि खतरनाक स्टंटमुळे विद्युतची मनोरंजन विश्वात वेगळीच ओळख आहे.

त्याचा वाढदिवसामुळे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या खास दिवशी त्याने सोशल मिडियावर पोस्ट शेयर करत खळबळ उडवली आहे. या खास दिवशी त्याने इंस्टाग्रामवर त्याचा न्यूड फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेयर करत त्याने एक लांबलचक पोस्ट शेयर केली आहे. जी सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

हँडसम हंक म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या विद्युत जामवालने त्याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोंमध्ये विद्युत जंगलात दिसत आहे. एका फोटोमध्ये तो स्वयंपाक करताना दिसत आहे. पण तो न्यूड आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे- ‘ हिमालय पर्वत रांगेत मी परतलो – 'देवाचे निवासस्थान’. १४ वर्षांपुर्वी हे सुरू झालं. माझ्या लक्षात येण्या आधीच... दरवर्षी 7-10 दिवस एकटे घालवणे हा माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला.

'लक्झरी आणि आनंदाच्या जीवनातून जंगलात येताना, मला माझा एकटेपणा शोधायला आवडतो आणि "मी कोण नाही" हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. "मी कोण आहे" हे जाणून घेण्यासाठी आणि शांततेत स्वतःचे संरक्षण करण्याची ही पहिली पायरी आहे. निसर्गाने प्रदान केलेल्या लक्झरी..’

पुढे तो लिहितो, 'मी आता माझ्या पुढच्या प्रवासासाठी तयार आणि उत्साहित आहे - CRAKK 23 फेब्रुवारी 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे.'

हा फोटो स्थानिक मेंढपाळ मोहर सिंग यांनी काढल्याचे विद्युतने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.

सध्या त्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी या पोस्टवर कमेंट करत आहेत. तर अनेकांना रणवीर सिंहची आठवण आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT