Vikram Gokhale Death Esakal
मनोरंजन

Vikram Gokhale Death: मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा..सिनेतारकांनी वाहिली श्रद्धांजली

सकाळ डिजिटल टीम

 हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले. त्यांना ५ नोव्हेंबरपासून पुण्यातील पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारे दिग्गज अभिनेते आणि आवाजाचे बादशाह विक्रम गोखले यांचे आज निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने मराठी चित्रपटसृष्टी पोरकी झाल्याचं बोलले जाते.मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सिनेतारकांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

विविध क्षेत्रातिल मान्यवराकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. रोहिणी हट्टंगडी. यांनीही त्यांना श्रद्धांजली देत म्हणाल्या की त्याच्या स्वभाव आणि कामाची पद्धत कमाल होती. त्याच्या सारखा अभिनेता आता होणे नाही त्याच्या ‘बॅरिस्टर’ नाटकातील काम फार आवडलं. यावेळी त्याच्या आठवणींना उजाळा देतांना त्या भावूक झाल्या.

अलका कुबल यांनीही त्याच्या आठवणींना उजाळा देतांना म्हणाल्या की, वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्याच्यासोबत काम केलं. ‘मी मालक या देहाचा’ या नाटकापासून सुरवात केली. मराठी नाट्यभूमीतील बऱ्याच जणांचे ते आदर्श होते. त्याच्या अभिनयाला तोडचं नव्हती. ते डोळ्यातुन भावना व्यक्त करायचे. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती आता कुणीही भरु शकत नाही. त्याच्या जाण्याने खुप हळहळ होत आहे. इतकी प्रसिद्धी मिळवूनही त्यांनी कधीही गर्व केला नाही असंही त्या म्हणाल्या.

स्मिता जयकर यांनीही सोशल मिडियाद्वारे विक्रम गोखले यांना श्रद्धांजली वाहिली. 'माझे प्रिय मित्र ज्येष्ठ अभिनेते विक्रम जी. हम दिल दे चुके सनममधून आमची जोडी हिट जोडी ठरली. मी त्याच्यासोबत खूप काम केले होते.'अशी पोस्ट त्यांनी सोशल मिडियावर शेअर केली आहे.

अश्विनी भावे: 'आज आपण एक अद्वितीय अभिनेता आणि एक सह्रीदयी माणूस गमावला. त्यांच्या जाण्याने कला क्षेत्राचे खूप मोठं नुकसान झाले आहे ,जे कधीही भरून काढता येणार नाही. विक्रम गोखले म्हणजे आमच्या पिढीसाठी अभिनयाची शाळाच होती. माझ्या करिअरमधील तीन उत्तम आणि गाजलेल्या कलाकृतींमध्ये (पार्टनर मालिका, कळत नकळत आणि वजीर सिनेमा) विक्रमजींसोबत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यांच्या अनेक आठवणी कायम माझ्यासोबत असतील!'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Latest Maharashtra News Updates : आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला टोला, म्हणाले...

SCROLL FOR NEXT