Vikram Gokhale Death Esakal
मनोरंजन

Vikram Gokhale Death: हिंदीत सुद्धा यश मिळवणारे मोजके मराठी अभिनेते होते त्यात प्रमुख नाव यायचं विक्रम गोखले

सकाळ डिजिटल टीम

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर मागील पाच दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणारे मराठीसह बॉलीवुडमध्येही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावणारे दिग्गज अभिनेते आणि आवाजाचे बादशाह विक्रम गोखले यांचे आज निधन झाले आहे.

पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी वयाच्या ७७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. थोड्याच वेळात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बालगंधर्व नाट्यमंदिर येथे ठेवण्यात येणार आहे. तर, सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर वैकुंठधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

विक्रम गोखले यांनी मराठी नाटकं, चित्रपट त्याबरोबरचं अनेक हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.  त्यातच संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटातील ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेने त्यांना अधिक लोकप्रियता मिळाली. या चित्रपटात त्यानी एका रागीट, पुराणमतवादी आणि कडक शिस्तप्रिय वडिलांची भूमिका साकारली होती. ही भूमिका अजूनही लोकांच्या स्मरणात आहे. प्रेक्षकांना एका वडिलांची छबी त्याच्यात दिसली.  याशिवाय  त्यांनी ‘तुम बिन’ या चित्रपटातही कमाल अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. त्याच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

त्याबरोबरचं 'भूल भुलैया पार्ट वन', 'हिचकी', 'निकम्मा', 'अग्निपथ' आणि 'मिशन मंगल' 'दिल से' यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली. विक्रम गोखले यांनी केवळ नाटक आणि रुपेरी पडद्यावरच नव्हे तर  अनेक टीव्ही शोमध्येही काम केले आहे. त्यांनी दूरदर्शनच्या प्रसिद्ध शो 'उडान' आणि  ‘संजीवनी’ शोमधूनही प्रसिद्धी मिळवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Koli : ठाकरे गटाला मोठा धक्का! शरद कोळी 1 वर्षासाठी येरवाड्यात; नेमकं प्रकरण काय?

दुरुस्तीवेळी अचानक सुरू झाला बॉयलर, २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सुरक्षा साधनांच्या अभावामुळे दुर्घटनेचा नातेवाईकांचा आरोप

डोंबिवली सोडली, जिद्दीने गोरेगावला घेतलेलं घर; आता तेजश्री प्रधानवर आली तोही फ्लॅट सोडायची वेळ, नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates: राहुल गांधी आणि प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात; खासदारांचा विरोध, पोलिसांच्या बससमोर ठिय्या

Thane News: पाण्यासाठी मुंबईकडे धाव! ठाणे पालिकेकडून पिसे बंधाऱ्यातील ५० एमएलडीची मागणी

SCROLL FOR NEXT