vivek agnihotri on ashok pandit tweet over pathaan controversy Google
मनोरंजन

Pathaan Controversy: 'पठाण' सोबत होतेय 'द काश्मिर फाईल्सची' तुलना..काय आहे नवं प्रकरण?

विविध विषयांवर आपली थेट मत मांडत अनेकदा चर्चेत येणारे फिल्ममेकर अशोक पंडित यांनी ट्वीट करत पठाण आणि द काश्मिर फाईल्सची तुलना केलीय.

प्रणाली मोरे

Pathaan Controversy: फिल्ममेकर अशोक पंडित यांनी शाहरुख खानच्या 'पठाण' सिनेमावर होणाऱ्या ट्रोलिंगचे समर्थन केले आहे. अशोक पंडित यांनी आपल्या ट्वीट मध्ये लिहिलं आहे की,''जर विवेक अग्निहोत्रींना शीव्या देणं,ट्रोल करणं योग्य होतं,कारण तेव्हा संपूर्ण इंडस्ट्री शांत बसली होती,तर 'पठाण'साठी केल्या जाणाऱ्या स्टुपिड कमेंट्स आणि ट्रोलिंग योग्यच म्हणाव्या लागतील. पण सोबत अशोक पंडितनी याची दुसरी बाजू देखील दाखवली आहे.(director vivek agnihotri on ashok pandit tweet over pathaan controversy)

अशोक पंडित यांनी लिहिले आहे की,''जर काश्मिर फाइल्सवर केले गेलेले शाब्दिक हल्ले चुकीचे होते तर 'पठाण' ला देखील हेच लागू होतं''. अशोक पंडित यांच्या या ट्वीटला रीट्वीट करत विवेक अग्निहोत्री यांनी यावर सहमती दर्शवली आहे. विवेक अग्निहोत्री यांनी लिहिले आहे-''हम्म्म...काश्मिर फाइल्सच्या रिलीजवेळी लोकांनी या सिनेमाला खूप विरोध दर्शवला होता. आता शाहरुख आणि दीपिकाच्या 'पठाण' सिनेमाला खूप विरोध केला जातोय''.

अशोक पंडित यांनी लिहिलं आहे की,''आपले विरोधक निवडून त्यांना टार्गेट करायची गरज नाही. काही वेळेला आपलं शांत राहणं आपल्या शत्रूंना अधिक फायद्याचं ठरू शकतं, आणि यामागे तुमचा अजेंडा काही विशिष्ट हेतूने ठरलाय म्हणून तुम्ही शांत आहात असं देखील म्हटलं जाऊ शकतं. मी 'उडता पंजाब' आणि 'पद्मावत' सारख्या सिनेमांना जेव्हा विरोध झाला तेव्हा देखील सिनेमांच्या बाजूनं आवाज उठवला होता.पण त्यावेळी त्यांनाही इंडस्ट्रीमधून पाठिंबा मिळाला नव्हता''.

अशोक पंडित यांनी पुढे लिहिले आहे की- ''आपल्यातील फूटीचा वेगवेगळ्या स्तरावर लोकांनी फायदा घेतला आहे,घेत आहेत''. अशोक पंडित यांनी समस्त मूग गिळून बसलेल्या बॉलीवूडकरांसाठी ही पोस्ट लिहिल्याचं वाचताक्षणीच कळतंय.

शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांच्या 'पठाण' सिनेमाला वेगवेगळ्या कारणांनी ट्रोल केलं जात आहे. एकीकडे जिथे शाहरुख खान आणि दीपिका पदूकोण यांच्याशी जोडलेल्या जुन्या वादांना पुन्हा उकरून काढण्याचं काम केलं जात आहे तिथे दुसरीकडे 'पठाण' सिनेमातील 'बेशरम रंग' गाण्यावरनं रोज नवीन वाद निर्माण केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack in Karad : माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या नातवावर बिबट्याचा हल्ला; अधिराज पाटील जखमी, निवडणूक प्रचारातून घरी परतताना बिबट्याची झडप

ZP Elections 2026 Voting Live Update : कराड तालुक्यात ईव्हीएमचा खोळंबा; बुथ ७८ वरील मतदान रखडले, झोनल अधिकाऱ्यांची धावपळ

U19 World Cup: बॅटने इतिहास रचणाऱ्या वैभव सूर्यवंशीने मालिकावीर पुरस्कारानंतर शब्दांनी मनंही जिंकली, जाणून घ्या काय म्हणाला?

Pune News: राज्यातील शासकीय रुग्‍णालयांतील मोफत उपचार बंद; केसपेपरपासून शस्त्रक्रियेपर्यंत शुल्क, अडीच वर्षांनंतर आरोग्य विभागाचा यू-टर्न!

Pakistan Bomb Attack : पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादच्या शिया मशिदीत नमाजवेळी आत्मघाती हल्ला; ७० जणांचा मृत्यू, १७० हून अधिक जखमी

SCROLL FOR NEXT