Vivek Agnihotri takes dig at Besharam Rang in video  Google
मनोरंजन

Vivek Agnihotri नी उडवली 'पठाण'ची खिल्ली, व्हिडीओ शेअर करत शाहरुखची इज्जतच काढली...

'पठाण' सिनेमातील बेशरम रंग गाण्यावरनं गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु असताना बेधडक बोलणारे अग्निहोत्री गप्प का असा प्रश्न सर्वांनाच पडला होता.

प्रणाली मोरे

Vivek Agnihotri: शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्या 'पठाण' चित्रपटातील 'बेशरम रंग'गाणं रिलीज झालं आहे तेव्हापासून या गाण्यावर अनेक वाद सुरू झाले आहेत. काही राजकीय पक्षांनी या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या केसरी रंगाच्या बिकिनीमुळे गाण्यावर आणि चित्रपटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, तर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी चित्रपटातील वादग्रस्त गाणे, 'बेशरम रंग' याची आता खिल्ली उडवली आहे. (Vivek Agnihotri takes dig at Besharam Rang in video )

काश्‍मीर फाइल्सचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी बेशरम रंग गाण्याची खिल्ली उडवताना बॉलीवूडचे निर्माते, ओटीटी प्लॅटफॉर्मच्या भडक आशयाचा खरपूस समाचार घेतला आहे. विवेक यांनी त्यांच्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, "जिथे एक मुलगी बेशरम गाण्याला क्रिटिसाइज करत आहे. विवेक अग्निहोत्री यांनी व्हिडीओ शेअर करत लिहिले आहे की,''महत्त्वाची सूचना..हा व्हिडीओ बॉलीवूडच्या विरोधात आहे..जर तुम्ही सेक्युलर असाल तर याला पाहू नका''.

या व्हिडीओत दीपिका पदूकोण आणि शाहरुख खानला 'बेशरम रंग' च्या म्यूझिक व्हिडीओवर डान्स करताना आपण पाहू शकतो. गाण्याला क्रिटिसाइज करणारी मुलगी दीपिका-शाहरुखवर शाब्दिक प्रहार करत विचारतेय,''तुम्हाला असे अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून अशा प्रकारच्या अश्लील स्टेप्स करण्याची गरजच काय होती?''

''तुमच्या मते याला कंटेट म्हणतात का?'' त्यानंतर ती पुढे म्हणते..''हा असा व्हिडीओ पाहूनच महिलांसोबतचे गुन्हे घडतात. हे सगळं पैशासाठी करताय का? गाण्यात कुठल्या शब्दांचा वापर करता तुम्ही? लाज नाही वाटत तुम्हाला?'' या मुलीचा हा संपूर्ण संवाद सुरु असताना मागे बेशरम रंग गाणं सुरु ठेवलेलं दिसतं.

विवेकने व्हिडीओ शेअर करताच त्यांना काही नेटकऱ्यांनी पाठिंबा दिला. तर नेटकऱ्यांच्या एका गटाने त्यांच्याशी असहमत असल्याचं म्हटलं. एका नेटकऱ्यानं लिहिले, "धन्यवाद.. या मुलीनं खूप योग्य सांगितलंय. बॉलीवूडचा शाहरुख आणि घाणेरड्या कंटेटला बॉयकॉट करा." तर काही नेटकऱ्यांनी विवेक अग्निहोत्री यांनाही ट्रोल केले आहे.

"किती पैसे मिळाले हे करायला? तुम्ही काचेच्या घरात राहत आहात. विसरू नका." काही नेटकऱ्यांनी विवेक यांचे जुने ट्विट पुन्हा शेअर केलेयत आणि त्याबद्दल सर्वात अश्लील टिप्पणी देखील केली आहे. बर्‍याच नेटकऱ्यांनी त्यांच्या आधीच्या चित्रपटांची नावं देखील शेअर केली आहेत..ज्यात हेट स्टोरी, आणि झिद..अशांचा समावेश आहे.

विवेक अग्निहोत्रींचा , 'द व्हॅक्सिन वॉर' या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे. हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. द व्हॅक्सिन वॉर नंतर, विवेक 2024 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या दिल्ली फाइल्सचे दिग्दर्शन करण्यास सुरुवात करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT