Bollywood: When Nana Patekar told 'Triangaa' filmmaker if late actor Raaj Kumar interferes...Read Story Google
मनोरंजन

Nana Patekar: 'जर राजकुमार यांनी..', 'तिरंगा' चं शूट करताना नाना पाटेकरांनी दिग्दर्शकाकडे ठेवलेली अजब अट

मेहुल कुमार दिग्दर्शित 'तिरंगा' सिनेमात नाना पाटेकर यांनी काम करावं यासाठी स्वतः दिग्गज अभिनेते राजकुमार यांनी त्यांना समजावले होते.

प्रणाली मोरे

Nana Patekar Birthday: नाना पाटेकर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असं नाव आहे, ज्यांनी आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर लोकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहे. 1 जानेवारी 1951 रोजी जन्मलेले विश्वनाथ पाटेकर मोठ्या पडद्यावर नाना पाटेकर या नावाने ओळखले जात होते. त्यांचे सिनेमातील संवाद आणि भूमिका लोकांमध्ये खूप प्रसिद्ध झाले.

आज त्यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही न ऐकलेल्या गोष्टी सांगणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला कदाचितच माहिती असेल.(Bollywood: When Nana Patekar told 'Triangaa' filmmaker if late actor Raaj Kumar interferes...Read Story)

बॉलीवूड अभिनेते नाना पाटेकर त्यांच्या चित्रपटांच्या निवडीबाबत खूप सतर्क असायचे. नाना पाटेकर आणि राज कुमार 'तिरंगा' चित्रपटात एकत्र काम करताना दिसले होते. दोघांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले आणि बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट जबरदस्त हिट ठरला. मात्र, नाना पाटेकर यांनी सुरुवातीला या चित्रपटात काम करण्यास स्पष्टपणे नकार दिल्याचे खूप कमी लोकांना माहिती आहे.

वास्तविक नाना पाटेकर म्हणाले होते की, ''मी व्यावसायिक चित्रपटात काम करत नाही. मात्र, चित्रपटाचे दिग्दर्शक मेहुल कुमार यांना राज कुमार यांच्या सोबत चित्रपटात फक्त नाना पाटेकरच दिसावेत अशी इच्छा होती. यानंतर राज कुमार यांनी स्वतः जाऊन नाना पाटेकर यांना समजावले होते आणि चित्रपटाची स्क्रिप्ट एकदा वाचण्यास सांगितले होते. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मग जाऊन नाना पाटेकर यांनी चित्रपट करण्यास होकार दिला होता.

नाना पाटेकर यांनी चित्रपट करण्यास होकार दिला होता, पण त्याचवेळी एक अट ठेवली होती आणि ती अट होती की, जर राजकुमार यांनी त्यांच्या कामात अडथळा आणला तर नाना पाटेकर चित्रपटाच्या सेटवरून लगेच निघून जातील. चित्रपटात दोघांचीही पात्रं सारखीच होती. नाना आणि राज कुमार हे देशभक्त म्हणून दाखवले गेले होते पण चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांच्यात ३६ चा आकडा होता..अन् ते एकमेकांशी बोलतही नव्हते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral video : धावत्या एसटी बसमध्ये मद्यधुंद कंडक्टरचा राडा, ड्रायव्हरने बस थांबवली अन्... व्हिडिओ व्हायरल

Rain-Maharashtra Latest Live News Update: गेल्या २४ तासांत घाट क्षेत्र आणि उत्तर कोकणात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद

Sickle Cell Patients in Crisis: सिकलसेल रुग्ण संकटात; डागा रुग्णालयात हायड्रॉक्सीयुरियाचा तुटवडा, उपचाराऐवजी रुग्णांना दाराबाहेर

Women’s World Cup 2025: 'शेफाली वर्माला महिला संघातून वगळले'; विश्‍वकरंडकासाठी भारताचा संघ जाहीर, रेणुका सिंगचा समावेश

Mata Lakshmi: माता लक्ष्मी रात्री 'या' ठिकाणी करते भ्रमण, वाचा धार्मिक महत्व

SCROLL FOR NEXT