bollywoood actress kangana ranaut tweeted not very hard to understand why hindus were enslaved thousands years sadhguru 
मनोरंजन

यशोदा होती कृष्णाची प्रेमिका, सद्गगुरुंचा व्हिडिओ झाला होता व्हायरल; कंगणानं घेतली बाजू  

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई -  आपल्या रसाळ आणि अर्थपूर्ण प्रवचनांसाठी प्रसिध्द असणारे सदगुरु जग्गी वासुदेव आता वादाच्या भोव-यात सापडले आहे. ते त्यांच्या एका वक्तव्यामुळे टीकेचे धनी झाले आहेत. मात्र त्यांच्या समर्थनार्थ अभिनेत्री कंगणा उतरली आहे, तिनं सदगुरु यांना ट्रोल करणा-यांना जशास तसे उत्तर दिले आहे. तिनंही त्यांच्या वक्तव्यावर वेगळ्या बाजूनं काही मुद्दे मांडले आहे. त्यामुळे सुरुवातीला ज्यापध्दतीनं सदगुरु यांना विरोध करत होते त्यांचा विरोध काही प्रमाणात कमी झाला आहे. त्याचे झाले असे की सदगुरु यांनी यशोदेला कृष्णाची लव्हर संबोधल्यानं त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. यापूर्वीही सदगुरु त्यांच्या काही वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. कंगणानं केलेल्या सपोर्टमुळे तर आणखी त्यांच्यावर नाराजीचा सूर व्यक्त होत असल्याचेही दिसून आले आहे.

ज्यांनी सदगुरु यांच्यावर टीका केली आहे त्यांच्यावर कंगणानं सोशल मीडियावर सणसणीत चपराक दिली आहे. कंगणा तिच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्यांमुळे प्रसिध्द आहे. बॉलीवूडमधील सर्वात वादग्रस्त अभिनेत्री म्हणून कंगणाचा उल्लेख करावा लागेल. गेल्या काही वर्षांपासून कंगणानं अनेकांबरोबर पंगा घेतला आहे. त्यामुळे तिला अनेकदा न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहे. आपल्या वक्तव्यांवर ठाम राहणे अशीही कंगणाची ओळख आहे. कंगणासाठी कुठलाही विषय वर्ज्य नाही. राजकारण, समाजकारण यापासून ग्रामीण भारत, दिल्लीतील शेतकरी आंदोलन यासगळ्यावर कंगणा बोलू शकते. तिला विरोध करणा-यांचा ती आपल्या खास पध्दतीनं उत्तर देते.

आताही तिनं सदगुरु यांच्या बाजूनं किल्ला लढवला आहे. कंगणा म्हणाली आहे, काही वामपंथी नेहमीच सदगुरु यांना त्रास देतात. ते त्यांच्यासाठी मोठ्या डोकेदुखीचा विषय आहे. मात्र त्याचा फारसा विचार करण्याची गरज नाही. लोकं त्या टीकाकारांना एवढं महत्व का देतात हा खरा प्रश्न आहे. सदगुरु नेहमीच राष्ट्रवाद आणि हिंदू संस्कृती योद यांना महत्व देत असल्याचे दिसून आले आहे. दक्षिणपंथी त्यांना यासाठी त्रास देतात की ते लिब्रल आहेत आणि हिंदू देवदेवातांच्या धर्मग्रंथांचा सन्मान करताना दिसत नाहीत. 
एवढंच बोलून कंगणा थांबलेली नाही. पुढे ती म्हणते, मला काही गोष्ट समजत नाहीत. त्या कळायला जरा अवघड आहेत. त्या म्हणजे हिंदू हजारो वर्षांपासून गुलामित का होते. त्यांना तसे का ठेवले गेले, आपल्याकडे काही खास रणनिती नाही, काही योजना नाहीत, व्यवस्थापनही नाही, सगळा मुर्खपणा वाटटो मला. जे लोकं सदगुरु यांना दोष देतात ते त्यांच्या कावेरी बचावसाठी, ग्रामीण मुलांच्या शिक्षणासाठी आणि मंदिरं वाचविण्यासाठी उपक्रमाला सहकार्य करु शकणार नसतील तर अशांनी शांत बसावं.

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर सदगुरु यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते म्हणाले होते, यशोदा ही कृष्णाची लव्हर होती. मात्र नेटक-यांनी त्याचा अर्थ वेगळा काढला होता. त्यामुळे सदगुरु ट्रोल झाले होते. त्यानंतर ईशा फाऊंडेशनच्या वतीनं स्पष्टीकरणही देण्यात आले होते त्यात असे म्हटले होते, त्या व्हिडिओसोबत छेडछाड करण्यात आली आहे. सदगुरु यांनी यशोदेला प्रेमिका नव्हे तर भक्त असे म्हटले होते. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad Attacked : 'माझ्या हत्येचा कट रचला गेला होता, अन् याला पूर्णपणे जबाबदार..'' ; 'संभाजी ब्रिगेड'च्या प्रवीण गायकवाडांचा मोठा दावा!

Sangli Crime : मोक्कातील सांगलीच्या गुन्हेगाराचा सपासप वार करून खून, अल्पवयीन मुलांचा समावेश; वर्चस्ववाद नडला

Latest Marathi News Updates: रेल्वेच्या चौथ्या लाईन साठी शेतीच्या अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध

Beed Crime : बीडमध्ये विकृतीचा कळस! निवृत्त पोलिस फौजदाराला खोलीत डांबून बेदम मारहाण; पाणी मागितले असता तोंडावर केली लघुशंका

Russia Ukraine War: रशियाच्या हल्ल्यांत युक्रेनमध्ये दोन ठार

SCROLL FOR NEXT