Raj Kundra sakal media
मनोरंजन

राज कुंद्राची कोठडीतून सुटका नाहीच; मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

महानगर दंडाधिकारींनी दिलेला रिमांड बेकायदेशीर असल्याचा दावा कुंद्राने याचिकेत केला होता.

स्वाती वेमूल

मुंबई उच्च न्यायालयाकडून व्यावसायिक राज कुंद्रा Raj Kundra आणि त्याचा सहकारी रायन थोरपे Ryan Thorpe यांना दिलासा मिळाला नाही. पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी दंडाधिकाऱ्यांद्वारे मंजूर केलेल्या आदेशांना आव्हान देत कोठडीतून सुटका करण्याची याचिका या दोघांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती ए. एस. गडकरी यांनी आदेश सुनावताना म्हटलं, "महानगर दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली कोठडी कायद्याच्या अनुरुप आहे आणि त्यात कोणत्याही हस्तक्षेपाची गरज नाही." पोलिसांनी केलेली अटक बेकायदेशीर असून त्याची कायदेशीर पूर्वसूचना देण्यात आली नाही. त्यामुळे महानगर दंडाधिकारींनी दिलेला रिमांडही बेकायदेशीर आहे असा दावा कुंद्राने याचिकेत केला होता.

पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार लावलेले आरोपही चुकीचे असून त्याप्रमाणे कोणतेही कृत्य केलेले नाही, असा बचाव याचिकेत केला आहे. विशेष म्हणजे जो कथित कंटेंट अश्लील म्हणून पोलिसांकडून दाखवला जात आहे, तो कोणताही थेट अश्लील वर्तन किंवा अश्लील संबंध नाहीत. उलट हा कंटेंट शॉर्टफिल्म्सच्या माध्यमातून दाखविला असून तो त्या मागणीप्रमाणे विशिष्ट इच्छुक लोकांसाठी तयार केलेला आहे, असा दावा यामध्ये केला आहे. त्यामुळे जरी पोलिसांनी केलेला दावा खरा मानला तरी हा आरोप कलम 67 मध्ये येऊन जामिनपात्र गुन्हा होतो, असे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे ता. 20 रोजी दंडाधिकारी न्यायालयाने दिलेला पोलीस रिमांडचा आदेश रद्द करावा, अशी मागणी केली आहे.

कुंद्रा आणि त्याचा साथीदार रायन थोरपे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अश्लील चित्रफित निर्मिती प्रकरणी गुन्हे शाखेने कुंद्राला मुख्य सूत्रधार दाखवले आहे. त्याच्या खात्यात दर दिवशी लाखो रुपये जमा होत होते आणि हॉटशॉट्स अॅप्सच्या माध्यमातून हा प्रकार चालविला जात होता, असे पोलिसांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT